“ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की”; ‘धर्मवीर-2’चा टीझर पाहिलात का?

On: July 7, 2024 12:36 PM
Dharmaveer 2 Teaser Released
---Advertisement---

Dharmaveer 2 | बहुचर्चित सिनेमा ‘धर्मवीर-2’ चा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. या सिनेमाबाबत सध्या प्रचंड उत्सुकता आहे. येत्या 9 ऑगस्ट रोजी हा सिनेमा मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषांमध्ये सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. याच्या टीझरने सध्या धुमाकूळ घातला आहे.

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. तसेच कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम बघितले आहे.

‘धर्मवीर-2’ सिनेमाचा टीझर रिलीज

सिनेमाच्या टीझरमध्ये सुरुवातीलाच जबरदस्त डायलॉग दिसून येत आहेत. सुरुवातीलाच एक मुस्लिम महिला राखी बांधायला आनंद दिघेंकडे येते. इतर महिला देखील मोठ्या संख्येने तेथे राखी बांधायला आल्या असतात. तेव्हा एक मुस्लिम महिला बुरखा बांधून दिघे यांना राखी बांधण्यास येते.

अशावेळी तिला दिघे आपला बुरखा काढून चेहरा दाखवायला लावतात. तिने चेहरा दाखवताच तिला मारहाण झाल्याचं त्यांना कळतं आणि आनंद दिघे त्यावर संतापतात. राखी बांधायला राज्यभरातून आलेल्या समस्त (Dharmaveer 2) बहिणींना घेऊन ते त्या महिलेच्या घरी जातात.

याचवेळी ‘ज्याच्या घरातली स्त्री दुःखी, त्याची बरबादी नक्की!’, असा डायलॉग आनंद दिघे म्हणताना दिसून येतात. यामध्ये दिघेंच्या हिंदुत्वाची झलक देखील पाहायला मिळते. त्यामुळे आता या चित्रपटाविषयी तीव्र उत्सुकता निर्माण होत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

‘या’ तारखेला रिलीज होणार ‘धर्मवीर 2’

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच ‘धर्मवीर 2’ चित्रपटाचं पोस्टर लाँच करण्यात आलं होतं. या पोस्टरवर साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट असा उल्लेख करण्यात आला आहे. धर्मवीर चित्रपटात दिघे यांचे जीवनचरित्र दाखवल्यानंतर आता ‘धर्मवीर 2’मध्ये हिंदुत्त्वाची गोष्ट कशी दाखवली जाणार याकडे आता सर्वांचे (Dharmaveer 2) लक्ष लागलं आहे.

News Title –   Dharmaveer 2 Teaser Released

महत्त्वाच्या बातम्या-

वरळी ‘हिट अँड रन’ प्रकरणी मोठी अपडेट; शिवसेनेचा उपनेता पोलिसांच्या ताब्यात

आनंदवार्ता! ‘या’ शहरात पेट्रोल-डिझेल झालं स्वस्त; जाणून घ्या नवीन दर

“बर्थडे मुबारक हो कप्तान साहब…”; MS धोनीच्या वाढदिवशी सलमान खानची खास पोस्ट

आज ‘या’ राशींच्या धनसंपत्तीत अचानक वाढ होईल!

‘हिट अँड रन’ च्या घटनेने मुंबई हादरली; गाडीखाली चिरडून महिलेचा मृत्यू, चालक फरार

Join WhatsApp Group

Join Now