“जो हिंदू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; धर्मवीर-2 ची रिलीज डेट समोर

On: September 6, 2024 12:57 PM
---Advertisement---

Dharmaveer 2 | बहुचर्चित ‘धर्मवीर-2’ या चित्रपटाबाबत सध्या चाहत्यांना प्रचंड उत्सुकता लागली आहे. आता या चित्रपटाच्या रिलीज डेटबाबत अपडेट समोर आली आहे. चित्रपटाचा नवा ट्रेलर नुकताच समोर आला आहे. यामध्ये ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी गर्जना करणारे धर्मवीर आनंद दिघे साहेब दिसत आहेत. (Dharmaveer 2)

हा चित्रपट येत्या 27 सप्टेंबर 2024 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याआधी चित्रपटाची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली होती, मात्र आता चित्रपटाला प्रदर्शनाचा मुहूर्त मिळाला आहे. या चित्रपट धर्मवीर आनंद दिघे साहेब यांचा जीवनपट असून त्यात त्यांचे अनेक पैलू उलगडणार आहे.

धर्मवीर 2 चा नवा धमाकेदार ट्रेलर लाँच

या चित्रपटाची निर्मिती झी स्टुडिओज आणि साहील मोशन आर्ट्स या निर्मिती संस्थेचे मंगेश देसाई,उमेश कुमार बन्सल यांनी केली आहे. तर कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शनाची जबाबदारी ही प्रवीण तरडे यांनी निभावली आहे. तसेच कॅमेरामन म्हणून महेश लिमये यांनी काम बघितले आहे.(Dharmaveer 2)

या सिनेमात प्रसाद ओक, क्षितीश दाते यांच्या प्रमुख भूमिका आहेत.या पूर्वी प्रदर्शित केलेल्या टीजर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा तूफान प्रतिसाद मिळाला आहे. आता चित्रपटाचा आणखी एक नवा ट्रेलर लाँच करण्यात आला आहे. हा चित्रपट मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये देशभरात प्रदर्शित केला जाणार आहे.

धर्मवीर 2 कधी रिलीज होणार?

संगीतकार चिनार महेश आणि अविनाश विश्वजित यांनी धर्मवीर 2 मधील गाण्यांचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. नुकत्याच आलेल्या नव्या ट्रेलरमध्ये ‘जो हिंदू हित की बात करेगा, वही देशपर राज करेगा’ अशी गर्जना करताना आनंद दिघे दिसून येत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता आणखीनच वाढली आहे.(Dharmaveer 2) 27 सप्टेंबररोजी हा चित्रपट रिलीज होईल.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mangesh Desai (@mangeshdesaiofficial)

News Title –   Dharmaveer 2 Release date announced

महत्त्वाच्या बातम्या-

पुढील 24 तास धोक्याचे, IMD कडून ‘या’ जिल्ह्यांसाठी महत्वाचा इशारा

कांद्याचे भाव कडाडले! महागड्या कांद्यापासून दिलासा मिळणार का?

रवींद्र जडेजाची दुसऱ्या इनिंगला सुरुवात! ‘या’ राजकीय पक्षात एन्ट्री

मोठी बातमी! जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

लाडक्या बाप्पाच्या आगमनापूर्वीच आनंदवार्ता, सोन्याचे दर घरसले; काय आहे सध्या भाव?

Join WhatsApp Group

Join Now