परळीत धनंजय मुंडेंचीच हवा; धनंजय मुंडेंच्या विजयानंतर जल्लोष

On: November 23, 2024 12:59 PM
Dhananjay Munde धनंजय मुंडे
---Advertisement---

Parli Vidhansabha | यंदाच्या विधानसभा निवडणुकीत बीड जिल्ह्यातही वेगळंच चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे, जिल्ह्यातील परळी विधानसभा (Parli Vidhansabha) मतदारसंघात नेमकं काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. परळीत धनंजय मुंडेंचीच हवा हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.

राष्ट्रवादी अजित पवार महायुतीचे उमेदवार धनंजय मुंडे यांचा परळीतून विजय झाला आहे. धनंजय मुंडेंना 50 हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचे दिसून येते. तर, महाविकास आघाडीचे राजेसाहेब देशमुख यांचा पराभव झाला आहे.

बीडच्या परळीमध्ये (Parli Vidhansabha) धनंजय मुंडे विरूद्ध शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यात मुख्य लढत बघायला मिळाली. दरवेळी पंकजा मुंडे विरूद्ध धनंजय मुंडे अशी लढत रंगते. मात्र, महायुतीमध्ये ही जागा धनंजय मुंडे यांच्याकडे गेली

परळी मतदार संघाचा निकाल आला असून धनंजय मुंडे हे विजयी ठरले आहे. महायुतीचा हा मोठा विजय मानला जातोय. अजित पवार गटाकडून धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक लढवली.

मुंडेंसाठी ही लढत प्रतिष्ठेची नक्कीच आहे. त्यामध्येच सुरूवातीपासूनच धनंजय मुंडे हे आघाडीवर होते. धनंजय मुंडेचे लीड चांगलेच वाढताना दिसले. 11 फेरीत ते 64397 मतांची आघाडीवर होते.

महत्त्वाच्या बातम्या- 

विजयाचे पोस्टर लावूनही पराभूत झालेले नेते, पाहा एका क्लिकवर

भाजपने मोडला रेकॉर्ड; ‘हा’ निर्णय ठरला महायुतीसाठी गेमचेंजर

कोकणात भाजपचा पहिला विजय, नितेश राणेंनी उधळला विजयी गुलाल

भाजपचा ‘हा’ बडा नेता होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?, भाजप नेत्याने सांगूनच टाकलं

महाराष्ट्रात भाजपच मोठा भाऊ, आता मुख्यमंत्रीही फडणवीसच होणार?

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now