ते पुन्हा आले….; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

On: December 4, 2024 1:29 PM
Devendra Fadnavis
---Advertisement---

Devendra Fadnavis | भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. उद्या 5 डिसेंबर रोजी फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे 21 वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.

देवेंद्र फडणवीसांची कारकिर्द

1989 साली देवेंद्र फडणवीस भाजपमध्ये सक्रीय झाले होते. त्यांच्यावर भाजप युवा मोर्चाच्या वॉर्ड अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली होती. पुढे 1990 साली ते नागपूर शहराच्या पश्चिम विभागाची जबाबदारी देण्यात आली. 1992 ला देवेंद्र फडणवीस हे भाजप युवा मोर्चाचे नागपूर शहर अध्यक्ष झाले. 1992 ते 2001 या काळात ते नागपूरचे महापौर झाले. सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य म्हणून निवडून आले. तसंच सर्वात तरूण महापौर होण्याचा बहुमानही फडणवीस यांच्याच नावावर आहे.

पुढे दोन वर्षात 1994 ला फडणवीस भाजप युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष झाले. 1999 साली ते पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. 2001 साली देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता युवा मोर्चाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी नियुक्ती झाली. 2010 ला भाजपच्या प्रदेश सरचिटणीसपदाचीही जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली. 2013 हे साल देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं ठरलं. कारण याच काळात त्यांच्याकडे भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली.

Devendra Fadnavis | 80 तासात सरकार पडलं

2014 च्या निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस हे पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री झाले. यावेळी ते 44 वर्षांचे होते. 2014 ते 2019 पर्यंत त्यांनी राज्याचा कारभार सांभाळला. शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर 2019 ला अजित पवारांसोबत देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतली. पण हे सरकार 80 तासात पडलं. पण पुन्हा शिंदेसोबत आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपद सोडत उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी स्विकारली. आता पुन्हा ते मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

विधीमंडळ गटनेतेपदी निवड होताच देवेंद्र फडणवीसांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

अखेर ठरलंं! भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत सर्वात मोठा निर्णय

आता केवळ ‘या’ पात्र महिलांनाच मिळणार लाडक्या बहिण योजनेचा लाभ; काय आहेत अटी?

महायुतीच्या शपथविधीसाठी उद्धव-राज ठाकरेंसह शरद पवारांनाही आमंत्रण; कोण-कोण लावणार हजेरी?

महायुतीत कुणाला किती मंत्रीपदं मिळणार?, सर्वात मोठी अपडेट समोर

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now