उपमुख्यमंत्र्यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड!

On: September 27, 2024 1:27 PM
Devendra Fadnavis office attack
---Advertisement---

Devendra Fadnavis office attack l राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयातील कार्यालयाची एका अज्ञात महिलेने तोडफोड केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला मंत्रालयात जाण्यासाठीचा पास न काढता मंत्रालयात शिरली. त्यावेळी त्या महिलेने सचिवांसाठी असलेल्या गेटने मंत्रालयात प्रवेश केला. त्यानंतर त्या अज्ञात महिलेने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis Office) यांच्या कार्यालयाची तोडफोड केली.

फडणवीसांच्या कार्यालयाची अज्ञात महिलेकडून तोडफोड :

अज्ञात महिला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयाची तोडफोड करून त्यानंतर तिथून निघून गेली. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आल्यानंतर सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे आता पोलिसांनी त्या महिलेचा शोध सुरु केला आहे. याशिवाय पोलीस आयुक्तांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेतली असून महिलेचा शोध युद्धपातळीवर सुरु असल्याचं दिसून येत आहे.

मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाची मंत्रालयात जाऊन तोडफोड केल्याने मंत्रालयाच्या सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी समोर आल्याची बाब उघडकीस आली आहे. तसेच ती अज्ञात महिला गुरुवारी रात्री मंत्रालयात शिरली होती. मात्र त्यावेळी मंत्रालयाच्या परिसरात देखील फारसा पोलीस बंदोबस्त नव्हता. त्यामुळे ती महिला कोणाच्याही लक्षात न येता सचिवांच्या गेटने थेट अगदी सहजपणे मंत्रालयात शिरली. यानंतर त्या महिलेने देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड केली.

Devendra Fadnavis office attack l मरिनड्राईव्ह पोलिस तपास करत आहेत :

याशिवाय त्या अज्ञात महिलेने कार्यालयाबाहेर देवेंद्र फडणवीसांची नेमप्लेट काढून देखील फेकली आणि यानंतर घोषणाबाजी केल्याची घटना घडली आहे. मात्र आता ही महिला नक्की काय म्हणत होती हे अद्याप समजलेले नाही. तसेच ही महिला कोण होती आणि ती विनापास आतमध्ये कशी शिरली या सर्व प्रश्नांची उत्तरे अद्याप अस्पष्ट आहेत.

आता या संपूर्ण घटनेचा मरिनड्राईव्ह पोलिसांनी युद्धपातळीवर तपास सुरु केला आहे. त्यामुळे आता या तपासातून काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल.

News Title – Devendra Fadnavis office attack

महत्त्वाच्या बातम्या-

…तर या मुद्द्यावरून पुण्याचं राजकारण तापलं! विरोधी पक्षाने दिला ‘हा’ इशारा

अबब! सोनं पोहोचलं 80 हजारांवर?, दरवाढीचे तोडले रेकॉर्ड

‘बदला पुरा’; अक्षय शिंदे एन्काऊंटर प्रकरणी फडणवीसांचं रोखठोक भाष्य!

धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन मुलीवर चौघांकडून अत्याचार

‘तारक मेहता..’च्या निर्मात्यांवर पुन्हा शोषणाचे आरोप, ‘या’ अभिनेत्रीने सोडली मालिका

 

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now