Deepika Padukone | बाॅलिवूडमधील सर्वाेत्कृष्ट जोडप्यांपैकी दीपिका आणि रणवीर सिंग यांची एक जोडी आहे. ऑनस्क्रिन असो किंवा ऑफस्क्रिन त्यांनी प्रेक्षकांच्या मनात घर केलं आहे. दोघेही सतत चर्चेत असतात. काही दिवसांपूर्वी दीपिका आणि रणवीर आई बाबा झाले. त्यांना एक गोंडस मुलगी झाली असून सध्या तिचीच चर्चा सुरु आहे. आपल्या लाडक्या लेकीसाठी रणवीर आणि दीपिकाने नवं घर देखील घेतलं आहे. दरम्यान, डिस्चार्ज मिळाल्यानंतर नव्या घरी जात असताना दीपिका तिच्या मुलीसोबत स्पाॅट झाली आहे.
8 स्पटेंबरला दीपिका आणि रणवीर आई बाबा झाले. दीपिकाने (Deepika Padukone) एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर सोशल मीडियावर दिपीका आणि रणवीरच्या चाहत्यांनी कमेंट्स करत दोघाचं अभिनंदन केलं. नुकतंच तिला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर रणवीर आणि दीपिकाचा बाळासोबत पहिला फोटो सोशल मीडियावर समोर आला आहे.
सोशल मीडियावर फोटो व्हायरल-
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर दीपिका (Deepika Padukone) घरी परतत असताना पापाराझींनी तिचा हा फोटो काढला आहे. यात कारच्या मागच्या सीटवर रणवीर आणि दीपिका बसलेले दिसत असून दीपिकाच्या हातात बाळ आहे.
View this post on Instagram
दीपिका बाळाकडे पाहून हसताना दिसतेय तर रणवीरसुद्धा अत्यंत प्रेमाने बाळाकडे पाहतोय. या फोटोमध्ये दीपिकाचे सासरे आणि रणवीरचे वडीलसुद्धा हसताना दिसत आहेत. या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे. आई झाल्यानंतर दीपिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरील बायो बदलला आहे. तिच्या बायोमधील या नव्या मजकूराने नेटकऱ्यांचं लक्ष वेधलं आहे.
News Title : deepika padukone holds daughter in her hand
महत्त्वाच्या बातम्या-
…तर हा नेता महाविकास आघाडीच्या वळू- रेड्यांना चाबकाने फोडून काढणार
पुणे हादरलं! भररस्त्यात गोळीबार अन् पुढे घडल भयंकर
राहुल गांधींची जीभ छाटेल त्याला 11 लाखांचं बक्षीस; ‘या’ आमदाराची जीभ घसरली
शरद पवारांमुळे महाराष्ट्राला जातीयवादाचा कॅन्सर झालाय, ‘या’ नेत्याची जहरी टीका
स्वित्झर्लंड विसरा, हनीमूनसाठी बेस्ट आहेत भारतातील ‘ही’ 4 ठिकाणं!






