मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? दीपक केसरकरांनी तारीख सांगितली

On: November 29, 2024 5:04 PM
Maharashtra
---Advertisement---

Maharashtra l राज्यात विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. त्यामुळे राज्यात सत्ता देखील महायुतीचीच असणार आहे. यावेळी विधानसभेत महाविकास आघाडीला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. कारण यावेळी मतदारांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिले आहे. मात्र महाराष्ट्रात महायुट्रीची सत्ता येऊनही अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झाला नाही. कारण मुख्यमंत्री कोण होणार याचा तिढा सुटलेला नाही.

मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी? :

अशातच आता महायुतीतील एका नेत्याने मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात एक मोठं वक्तव्य केले आहे. शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कधी होणार? तसेच सत्तास्थापनेचा दावा कधी केला जाणार? यावर भाष्य केलं आहे. यावेळी दीपक केसरकर म्हणाले की, “सध्या चांगला मुहूर्त नाही, येत्या 2 तारखेपासून चांगले मुहूर्त सुरु होतं आहेत”. त्यामुळे 2 डिसेंबरनंतर नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होऊ शकतो असं केसरकर म्हणाले आहेत.

तसेच 2 डिसेंबरनंतर कधीही महाराष्ट्र सरकार स्थापन होऊ शकतं. याशिवाय या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री अशी अनेक दिग्गज लोक उपस्थितीत राहण्याची शक्यता आहे.

Maharashtra l एकनाथ शिंदेंचे मोदींसह चांगले संबंध :

शिवसेना शिंदे गटाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांचे केंद्र सरकारसोबत चांगले संबंध आहेत. त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाहांसोबत देखील शिंदेंचे चांगले संबंध आहेत. त्यामुळे शिंदे साहेबांचा योग्य सन्मान ठेवला जाईल असं देखील दिल्लीतून सांगण्यात आलं आहे.

News Title :Deepak Kesarkar comment on Maharashtra Government Formation Date 

महत्वाच्या बातम्या –

प्रधानमंत्री जन आरोग्य योजना काय आहे? अशाप्रकारे करा नोंदणी

क्रिकेट विश्वात शोककळा पसरली, क्रिकेटपटूचा मैदानातच मृत्यू

उपमुख्यमंत्री व्हा नाहीतर…; शिंदेंसमोर दिल्लीत भाजपाने ठेवल्या ‘या’ 2 मोठ्या ऑफर्स?

‘ते’ वादग्रस्त प्रकरण भोवणार, शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राच्या अडचणीत पुन्हा वाढ

सत्ता स्थापनेपूर्वीच तातडीने 10 कोटींचा निधी मंजूर!

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now