मोठी बातमी! शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी

On: December 13, 2022 4:55 PM
---Advertisement---

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी फोन करून शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्या आली आहे.

पोलिसांनी या फोनची गंभीर दखल घेतली असून कॉल करणाऱ्यांची ओळख पटवण्यात आली आहे. तर दुसरीकडे फोन करणारा व्यक्ती हा वेडा असल्याचा दावा शरद पवार यांच्या कार्यालयाच्या वतीने करण्यात आला आहे.

देशी कट्ट्याने ठार मारू, असा इशारा धमकी देणाऱ्या व्यक्तीने दिला आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.

काल शरद पवार यांचा वाढदिवस झाला. वाढदिवसानंतर लगेचच ही धमकी आल्याने पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.

दरम्यान, फोन करणारी व्यक्ती हिंदीतून बोलत होती. त्या व्यक्तीचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now