मोठी बातमी! नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी

On: January 14, 2023 2:21 PM
---Advertisement---

मुंबई | राजकीय वर्तुळातून सध्याची सगळ्यात मोठी बातमी समोर येतीय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामध्ये दोन कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली आहे.

नागपुरात नितीन गडकरी यांच्या कार्यालयात तब्बल तीन वेळा धमकीचा फोन येऊन गेला आहे. नागपुरातील ऑरेज सिटी (Orange City) रुग्णालयाजवळील जनसंपर्क कार्यालयात हा फोन आला आहे.

नितीन गडकरी यांना आम्ही जीवे मारु अशा आशयाच्या धमकीचे फोन आले आहेत. फोन करणाऱ्या व्यक्तीने दाऊदचा उल्लेख करत आम्हाला खंडणी न मिळाल्यास गडकरींना जीवे मारु अशी धमकी दिली आहे.

सकाळी 11.29, 11.35 आणि 12.32 ला हे फोन येऊन गेले आहेत. दरम्यान, या घटनेनंतर पोलीस अधिकारी (police officer) गडकरींच्या जनसंपर्क कार्यालयात पोहोचले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Join WhatsApp Group

Join Now