उच्च शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना मिळणार आर्थिक सहाय्य; सायबेजखुशबू शिष्यवृत्तीसाठी अर्ज सुरू

On: June 24, 2024 7:31 PM
Annabhau Sathe Fellowship
---Advertisement---

CybageKhushboo Scholarship 2024 | सायबेजख़ुशबु संस्था गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य करत असते. गरजू आणि होतकरू विद्यार्थी निवडून त्यांचा शैक्षणिक प्रवास सुकर करण्यासाठी ही संस्था शिष्यवृत्ती देत असते. यावर्षीची अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. या शिष्यवृत्तीसाठीचे निकष, अर्ज करण्याची तारीख तसेच इतर सर्व माहिती या लेखात सविस्तर दिली आहे.

शिष्यवृत्तीसाठी पात्रता निकष

या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याला 10 वी आणि 12 वीच्या परीक्षेत 60% पेक्षा जास्त गुण असावेत व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.5 लाखापेक्षा कमी असावे.

10 वी आणि १२ वीच्या परीक्षेत 80% पेक्षा जास्त गुण असावेत व कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.8 लाखापेक्षा कमी असावे. तसेच गुणवत्तेवर आधारित सरकारी किंवा खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळालेला (CybageKhushboo Scholarship 2024) असावा. (डोनेशन किंवा मॅनेजमेंट कोट्यातून प्रवेश मिळालेले विद्यार्थी पात्र नाहीत)

‘या’ अभ्यासक्रमांसाठी मिळणार शिष्यवृत्ती

अभियांत्रिकी(इंजिनिअरिंग), औषध(मेडिकल), फार्मसी, नर्सिंग, व्यवस्थापन(मॅनेजमेंट), आर्किटेक्चर, बीसीए, बीबीए, एमबीए, बीएससी कॉम्प्युटर इत्यादि शैक्षणिक अभ्यासक्रम अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहे. दरम्यान, या शिष्यवृत्तीसाठी पुणे, अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातील रहिवासी कुटुंबातील विद्यार्थी पात्र आहेत.

अर्ज करण्याची तारीख

विद्यार्थी 1 जुलै 2024 ते 15 ऑगस्ट 2024 या कालावधीत http://www.cybagekhushboo.org या वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज भरू शकतात.

इतर सूचना

  • ही शिष्यवृत्ती प्रथम वर्ष किंवा थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठीच आहे. तृतीय वर्ष किंवा त्यापुढील वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करू नयेत.
  • ही शिष्यवृत्ती 11वी, 12 वी, बीए, बीकॉम, बीएससीसाठी किंवा परदेशात शिक्षण घेण्यासाठी नाही.
  • ऑनलाइन अर्ज भरण्याआधी नोंदणी मार्गदर्शक (रेजिस्ट्रेशन गाईड) डाउनलोड करावे आणि त्यात दिलेल्या सूचना वाचून त्यानुसारच अर्ज भरावा.
  • सर्व माहिती अचूक व परिपूर्ण भरावी.
  • मासिक उत्पन्न व त्याचा सर्व तपशील भरावा.
  • कुटुंबातील सर्व सदस्यांची (CybageKhushboo Scholarship 2024) माहिती अॅड मेंबर बटणाचा वापर करून भरावी.
  • अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
News Title –  CybageKhushboo Scholarship 2024
महत्त्वाच्या बातम्या

सरोगेट मातांसाठी मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय!

‘या’ 7 गोष्टी नेहमी लक्षात ठेवा; तुमचा कधीही पराभव होणार नाही

पिपाणी चिन्हावरून मतदारांमध्ये संभ्रम; शरद पवारांचं थेट निवडणूक आयोगाला पत्र

“या बांडगुळांनी लोकसभेत हिंदुत्व हिंदुत्व, मुसलमान मुसलमान करत…”

“कितीही टणाटणा उड्या मारूद्यात..”; किरण मानेंची ‘ती’ पोस्ट चर्चेत

Join WhatsApp Group

Join Now