CSK vs MI | आयपीएल 2025 च्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने मुंबई इंडियन्सवर 4 विकेट्सनी विजय मिळवत दमदार सलामी दिली. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात चेन्नईने पुन्हा एकदा मुंबईच्या सलामीतील विजयाच्या आशांना झटका दिला. रचीन रवींद्रच्या विजयी षटकाराने चेन्नईने 13 वर्षांचा मुंबईचा पराभवाचा इतिहास कायम ठेवला. (CSK vs MI )
रचीन-ऋतुराजची दमदार जोडी, चेन्नईची सहज विजयी धाव
मुंबई इंडियन्सने दिलेलं 156 धावांचं लक्ष्य चेन्नईने 19.1 षटकांत 6 विकेट गमावून पूर्ण केलं. चेन्नईकडून कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) याने आक्रमक शैलीत 26 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकारांसह 53 धावा केल्या. त्याला उत्तम साथ मिळाली रचीन रवींद्र (Rachin Ravindra) कडून, ज्याने नाबाद 65 धावांची खेळी केली. त्याने 45 चेंडूत 4 षटकार आणि 2 चौकार मारून चेन्नईला विजयापर्यंत नेलं.
अन्य फलंदाजांतून जडेजाने 17, शिवम दुबेने 9, सॅम करनने 4, दीपक हुड्डाने 3 आणि राहुल त्रिपाठीने 2 धावा केल्या. धोनी मात्र नाबाद राहिला पण खाते उघडू शकला नाही. मुंबईकडून युवा गोलंदाज विघ्नेश पुथुर याने चांगली कामगिरी करत 3 विकेट घेतल्या. विल जॅक्स आणि दीपक चहर यांनी प्रत्येकी 1 बळी टिपला. (CSK vs MI )
मुंबईचा सलामीतील अपयशाचा विक्रम कायम
मुंबई इंडियन्ससाठी हा पराभव विशेषतः क्लेशदायक ठरला, कारण सलग 13 व्या वर्षीही त्यांना सलामीच्या सामन्यात विजय मिळवता आला नाही. 2012 नंतर प्रत्येक वर्षी पहिल्या सामन्यात मुंबईला पराभवाचा सामना करावा लागतो आहे. यंदाच्या मोसमात सूर्यकुमार यादवच्या (Suryakumar Yadav) नेतृत्वात पलटणने विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न केला, पण पुन्हा अपयश पदरी पडलं.
मुंबई इंडियन्स प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन, विल जॅक्स, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नमन धीर, रॉबिन मिन्झ, मिचेल सॅटनर, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट आणि सत्यनारायण राजू
चेन्नई सुपर किंग्ज प्लेइंग ईलेव्हन : ऋतुराज गायकवाड, रचीन रवींद्र, दीपक हुड्डा, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, सॅम करन, एमएस धोनी, आर अश्विन, नूर अहमद, नॅथन एलिस आणि खलील अहमद यांचा समावेश होता.
Title : CSK vs MI CSK Starts IPL 2025 with Win






