बॉयफ्रेंडने लग्नाला नकार दिल्याने गर्लफ्रेंडने केलं धक्कादायक कृत्य

Crime News | बिहारमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बिहारच्या सारण येथे एका तरूणीला तिच्या प्रियकराने विवाहासाठी नकार दिल्याने तरूणीने प्रियकराचे प्रायव्हेट पार्ट कापल्याचे धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने सारण येथे मोठी खळबळ उडाली आहे. तरूणी आणि प्रियकर हे गेल्या दोन वर्षांपासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र ते कोर्ट मॅऱेज करणार होते. मात्र अचानक प्रियकराने विवाहासाठी नकार दिल्याने तरूणीने त्याचे प्रायव्हेट पार्ट कापले असल्याची माहिती समोर आली आहे.  (Crime News)

याप्रकरणी तरूणीवर गुन्हा दाखल :

पीडित व्यक्तीला पाटणा येथील स्थानिक रूग्णालयात पाठवण्यात आलं आहे. याप्रकरणी आता तरूणीवर गुन्हा दाखल झाला असून घडलेल्या घटनेप्रसंगी पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली असल्याची माहिती समोर आली आहे. (Crime News)

या घडलेल्या घटनेची माहिती सारण पोलिसांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे. सारण पोलिसांनी काढलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, “1 जुलै रोजी मरहौरा पोलीस ठाण्यात प्रेमप्रकरणातून एका मुलीने प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट कापल्यानंतर जखमी केलं असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच जखमी पीडित व्यक्ती विकास सिंह याला सदर रूग्णालयात छप्रा येथे पाठवण्यात आलं आहे”. (Crime News)

विवाहासाठी नकार दिल्याने केलं धक्कादायक कृत्य :

हल्लेखोर तरूणीला मरहौरा पोलीस ठाण्यात चौकशीसाठी बोलवण्यात आलं होतं. त्यावेळी आरोपी तरूणीने चौकशी वेळी घडलेला प्रकार सांगितला आहे. तरूणीने सांगितलं की पीडित प्रियकर हा दोन वर्षे सोबत रिलेशनशिपमध्ये होता. त्यानंतर तो छप्रा येथील न्यायालयात विवाह करणार होते. मात्र तरूणाने विवाहासाठी नकार दिल्याने. प्रेयसी तरूणीने हे धक्कादायक कृत्य केलं आहे. (Crime News)

याप्रकरणी मऱ्हाळरा पोलीस ठाण्यात आरोपी मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जखमी मुलाला सदर हॉस्पिटल छप्रा य़ेथून उपचारांसाठी पाटणा येथील सृष्टी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आलं आहे.सध्या पटणा येथे जखमी मुलावर उपचार सुरू आहेत.

News Title – Crime News Of Bihar Girl Friend Cut The Private Part Of His Boy Friend

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! पुण्यातील धबधबे ‘या’ तारखेपर्यंत पर्यटकांसाठी बंद

गर्भवती महिलांना झिका व्हायरस झाल्यास बाळाला धोका आहे का?

नाशिक शिक्षक मतदारसंघाचा निकाल जाहीर; ‘या’ उमेदवाराने मिळवला विजय

महत्वाची बातमी! पुढील दोन दिवस राज्यात पाऊस हजेरी लावणार का?

पुणेकरांसाठी धोक्याची घंटा; ‘या’ भागातील दोन गर्भवती महिलांना झाली झिकाची लागण