भयंकर! वर्षभराच्या बाळासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, नंतर मृतदेह गोणीत भरून…

On: January 10, 2025 8:31 AM
Crime News Meerut Murder case update
---Advertisement---

Crime News | उत्तर प्रदेशातील मेरठ जिल्ह्यात अत्यंत खळबळजनक घटना घडली आहे. लिसाडी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुहेल गार्डन कॉलनीत एकाच घरात 5 मृतदेह आढळून आले आहेत. एकाच कुटुंबातील या पाच जणांची हत्या अत्यंत क्रूरपणे करण्यात आली. तीन मृतदेह बेडच्या आत तर दोघांचे मृतदेह जमिनीवर पडलेले आढळून आले. या सर्वांची एवढी भयानक, क्रूर हत्या कोणी केली याबाबत आता तपास सुरू आहे. (Crime News)

मृतांमध्ये पती-पत्नी आणि त्यांच्या तीन मुलींचा समावेश असून त्यातील एक मुलगी तर अवघी वर्षभराची आहे. त्यांचा मृतदेह गोणीत भरून बेडमध्ये कोंबण्यात आला होता. या हत्येने उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये मोइन, आसमा आणि त्यांच्या तीन मुली अफ्सा (8), अजीजा (4) आणि अदीबा (1) यांचा समावेश आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये घडली भयानक घटना

आरोपीने पती-पत्नीची हत्या करून त्यांचा मृतदेह जमिनीवर टाकला होता तर त्यांच्या तीनही मुलींची हत्या केल्यावर त्यांचे मृतदेह बेडच्या आतमधील बॉक्समध्ये ठेवले होते. यामध्ये अदीबाचा मृतदेह गोणीत भरून बेडच्या आत ठेवण्यात आला होता. इतका भयानक प्रकार घडला आणि आजूबाजूला कुणालाच खबरही नाही, याबाबतही आता अनेक सवाल निर्माण झाले आहे. (Crime News)

गुरुवारी रात्री ही भयानक घटना घडली. रात्री मृत मोईनचा भाऊ सलीम पत्नीसह घरी पोहोचला तेव्हा ही घटना उघडकीस आली. घराचे दार बाहेरून बंद होते. तसेच बुधवारपासून कुटुंबातील एकही सदस्य बाहेर पडला नसल्याचे शेजऱ्यांनी सांगितले. यानंतर सलीम या व्यक्तीने दार तोडले आणि समोर हे अतिशय हादरून टाकणारे दृश्य दिसले.

या हत्येची माहिती मिळताच पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. हत्याकांड घडलं तिथे, त्या घरातील सामान अस्ताव्यस्त पसरले होते, त्यामुळे घरात दरोड्याचा प्रयत्न झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. तसेच घराचा दरवाजा बाहेरून बंद असल्याने आरोपी दरवाजाला कुलूप लावून निघून गेला असावा असंही म्हटलं जातंय. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ माजली आहे. या हत्येचा आता तपास सुरू आहे. (Crime News)

News Title : Crime News Meerut Murder case update

महत्वाच्या बातम्या –

आज पुत्रदा एकादशी, भगवान विष्णू ‘या’ राशींवर करणार सुखाचा वर्षाव!

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावर अजितदादांनी मौन सोडले!

पुण्यातील मगरपट्टा ते एफसी रोड, आकाची संपत्ती किती?

वाल्मिक कराडवर ED ची कारवाई का होत नाही? सुप्रिया सुळेंचा सवाल

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांची अनोखी प्रेमकहाणी, बायको जापनीज कशी काय?

Join WhatsApp Group

Join Now