अजितदादांचा काँग्रेसला सर्वात मोठा धक्का; दोन बडे नेते राष्ट्रवादीत?

On: March 13, 2025 3:34 PM
Ajit Pawar
---Advertisement---

Maharashtra Politics l महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीत मोठी गळती सुरू असून, अनेक नेते महायुतीत प्रवेश करत आहेत. अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे, कारण पक्षाचे दोन वरिष्ठ नेते लवकरच राष्ट्रवादीत (NCP – Ajit Pawar) प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

काँग्रेस नेत्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश :

महाविकास आघाडीच्या (MVA) दारुण पराभवानंतर काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भाजप खासदार अशोकराव चव्हाण (Ashok Chavan) यांचे मेहुणे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर (Bhaskarrao Patil Khatgaonkar) राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. यासोबतच मीनल खतगावकर (Meenal Khatgaonkar) देखील राष्ट्रवादीच्या गोटात दाखल होणार असल्याची चर्चा आहे.

काँग्रेसकडून मीनल खतगावकर यांनी नायगाव विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता खतगावकर कुटुंब राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहे.

Maharashtra Politics l नांदेडमध्ये राष्ट्रवादीची ताकद वाढणार :

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर (Pratap Patil Chikhlikar) यांच्या प्रयत्नातून हा पक्षप्रवेश लवकरच अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत होणार आहे. काँग्रेसचे माजी आमदार मोहन हंबर्डे (Mohan Hambarde) यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता भास्करराव पाटील खतगावकरही राष्ट्रवादीत सामील होण्याची शक्यता असल्याने नांदेडमध्ये पक्षाची ताकद वाढेल.

महायुतीने (Mahayuti) विधानसभा निवडणुकीत मोठे यश मिळवल्यानंतर महाविकास आघाडीत (MVA) अस्वस्थता वाढली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी (Sharad Pawar गट), आणि शिवसेना (ठाकरे गट) या तिन्ही पक्षांमधील अनेक नेते सध्या महायुतीत प्रवेश करताना दिसत आहेत. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीची ताकद अधिक वाढण्याची शक्यता आहे.

News Title: Congress Leaders to Join NCP; Ajit Pawar’s Strength Grows

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now