Maharashtra Weather Update | महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा जोर पुन्हा वाढताना दिसत आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा पारा घसरू लागला असून अनेक ठिकाणी गारठा मोठ्या प्रमाणात जाणवत आहे. विशेषत: धुळे (Dhule), नाशिक (Nashik), विदर्भ या भागांत तापमान 5-6°C पर्यंत खाली आल्याने सकाळी व संध्याकाळी जोरदार थंडी जाणवत आहे. तसेच दुपारी देखील तापमान किंचित वाढत असले तरी पहाटे आणि रात्री गारठा जास्त प्रमाणात जाणवत आहे.
मुंबई आणि पुण्यातदेखील आता गारवा जाणवायला सुरुवात झाली आहे. मुंबईत सकाळी थंड हवा वाहताना दिसत असून पुण्यात देखील नागरिकांनी हिवाळी कपडे बाहेर काढले आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तापमान आणखी घसरण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच राज्यातील अनेक भागांत वातावरण कोरडे व स्वच्छ राहणार असून अचानक वाढलेल्या थंडीमुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. (Maharashtra Cold Wave)
कोकण–पश्चिम महाराष्ट्रात तापमानात घट :
कोकणातील पालघरमध्ये सकाळचे तापमान 16–17°C नोंदले जाईल, तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे तापमान 17–19°C पर्यंत पोहोचणार आहे. दुपारी मात्र या भागांमध्ये 30–32°C पर्यंत तापमान वाढेल. हवामान विभागाने कोकणात हवामान स्वच्छ, कोरडे आणि रात्री गारठा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली आहे. (Maharashtra Weather Update)
पश्चिम महाराष्ट्रातील पुणे (Pune Weather Update) परिसरातही गारवा वाढला असून सकाळच्या सत्रात तापमान कमी होत आहे. तसेच डिसेंबर महिन्यानुसार पुणे, सोलापूर (Solapur) आणि अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्ह्यात थंडीचा जोर पुढील तीन दिवस वाढत जाणार आहे. त्यामुळे नागरिकांना उबदार कपड्यांचा वापर व आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Maharashtra Weather Update | धुळे व नाशिकमध्ये पारा सर्वात कमी :
धुळ्यात (Dhule Cold Wave) तापमानाचा पारा तब्बल 5.4°C वर घसरला असून गेल्या काही दिवसांत थंडीचा जोर सातत्याने वाढत आहे. या थंडीचा गहू आणि हरभरा पिकांना फायदा होत असला तरी सर्वसामान्य जनजीवन विस्कळीत होत आहे. नाशिकच्या निफाड तालुक्यातील कुंदेवाडी गहू संशोधन केंद्रात किमान तापमान 6.4°C नोंदले गेले. अचानक वाढलेल्या थंडीमुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटविल्या जात आहेत.
याशिवाय राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. फुगवणीच्या टप्प्यावर असलेल्या द्राक्षांना थंडीमुळे तडे जाण्याची शक्यता वाढली आहे. यामुळे कृषी क्षेत्रात चिंता निर्माण झाली आहे. दरम्यान गोंदिया जिल्हा देखील गारठला असून येथे तापमान 8.2°C वर आले आहे, जे या हंगामातील सर्वात कमी तापमान असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार 11 डिसेंबरपर्यंत राज्यभर थंडीची लाट कायम राहणार आहे.






