Agriculture Policy 2025 l राज्यातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात गट शेतीसाठी लवकरच नवं धोरण जाहीर केलं जाणार असल्याची घोषणा केली आहे. शेतजमिनींचं तुकडीकरण, आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव आणि यांत्रिकी शेतीतील अडचणी लक्षात घेता गट शेती हा एक शाश्वत पर्याय ठरू शकतो, असं मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं.
राज्यात 75% शेतकरी अल्पभूधारक :
बालेवाडीत छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे पाणी फाउंडेशनच्या ‘सत्यमेव जयते फार्मर कप 2024’ कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. या कार्यक्रमात त्यांनी विविध कृषी गटांचा सत्कार केला आणि शेतकऱ्यांना सरकारच्या नव्या योजना समजावून सांगितल्या.
मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं की, राज्यातील 75 टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. त्यांच्या जवळ एक ते दोन हेक्टरपेक्षा कमी जमीन असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेणं, आधुनिक यंत्रांचा वापर करणं कठीण होतं. अशा परिस्थितीत गट शेती हा शेतीला बळकटी देणारा उपाय ठरू शकतो.
Agriculture Policy 2025 l गट शेतीचे फायदे काय? :
मोठ्या प्रमाणावर उत्पादन: एकत्रित जमिनीवर एकसंध शेती केल्यामुळे उत्पादन क्षमतेत वाढ होते.
यांत्रिकी शेतीस मदत: ट्रॅक्टर, हार्वेस्टर यांसारखी महागडी यंत्रं सामायिक वापरली जाऊ शकतात.
तंत्रज्ञानाचा वापर: ड्रोन, ठिबक सिंचन, मृद व्यवस्थापन यासारखी आधुनिक तंत्रे वापरणे शक्य होते.
समन्वय वाढतो: तंटे कमी होतात आणि आर्थिक लाभात वाढ होते.
सरकारी योजनांचा फायदा: गट शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान, कर्ज सुलभतेने मिळू शकते.
Agriculture Policy 2025 l शाश्वत शेतीसाठी पुढाकार :
राज्यातील शेती अधिक शाश्वत आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाचं ठरणार आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीत नवसंजीवनी मिळणार असून त्यांची आर्थिक उन्नती, उत्पादनवाढ आणि शेतीतील टिकावूपणा वाढणार आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, हे धोरण अंतिम टप्प्यात असून लवकरच अधिकृतपणे जाहीर केलं जाईल. शेतकऱ्यांनी समूह शेतीकडे वळण्याचा विचार करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केलं. या धोरणामुळे महाराष्ट्रातील शेतीला नवं वळण मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.






