“मी कोणाच्या बापाला घाबरत नाही’; चित्रा वाघ पुन्हा भडकल्या

On: January 13, 2023 5:41 PM
---Advertisement---

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री ऊर्फी जावेद (Urfi Javed) चांगलीच चर्चेत आहे. अशातच भाजप नेत्या (Chitra Wagh) चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या कपड्यांवरून पुन्हा उर्फीवर निशाणा साधलाय.

मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, तुमच्यात जितका दम आहे तितकं तुम्ही करा. उर्फी जावेदच्या कपड्यांना माझा विरोध कालही होता आजही आहे आणि उद्याही राहणार, असं चित्रा वाघ यांनी सांगितलं आहे.

तिने याठिकाणी काही पानचट म्हणावं आणि आमच्या मुलांचे फोटो व्हायरल करायचे. आमच्यावर टीका करून पोट भरलं नाही, तर तुम्ही आमच्या कुटुंबावर आलात. आमचा मुलांचा राजकारणासोबत काडीचा देखील संबंध नसताना त्यांचे फोटो व्हायरल करायचं तुम्ही काम केलं काय म्हणावं तुम्हाला, असं म्हणत त्यांनी माध्यमांवर निशाणा साधला.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिच्या फॅशनवर टीका करताना म्हणाल्या की, आमची ही संस्कृती नाही, हे फॅशनच्या नावाखाली चालू देणार नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now