Election Results 2026 | महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे निकाल हळूहळू समोर येत असताना छत्रपती संभाजीनगरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. पूर्वी शिवसेनेचा गड मानल्या जाणाऱ्या या शहरात यावेळी भाजपने मोठी आघाडी घेतली असून, शिंदे गट आणि ठाकरे गट दोघांनाही मोठा धक्का बसला आहे. त्याचवेळी एमआयएमनेही जोरदार मुसंडी मारत राजकीय समीकरण बदलून टाकले आहे.
एमआयएमचे उमेदवार 15 जागांवर पुढे :
आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार छत्रपती संभाजीनगर महापालिकेत भाजप 23 जागांवर आघाडीवर आहे. एमआयएमचे उमेदवार 15 जागांवर पुढे असून, शिवसेना (शिंदे गट) देखील 15 जागांवर आघाडीवर आहे. (Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026)
शिवसेना (ठाकरे गट) मात्र केवळ 8 जागांवरच आघाडीवर असून वंचित बहुजन आघाडी 4 आणि काँग्रेस 3 जागांवर पुढे आहेत.
Election Results 2026 | शिवसेनेचा गड गेला, राजकीय समीकरणात मोठा बदल :
छत्रपती संभाजीनगर हा अनेक वर्षांपासून शिवसेनेचा मजबूत बालेकिल्ला मानला जात होता. मात्र यावेळी भाजपने या गडाला सुरुंग लावत आघाडी घेतली आहे. शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली असताना अपेक्षित यश मिळालं नाही. उलट एमआयएमने मोठी कामगिरी करत महापालिकेतील सत्तासमीकरणात निर्णायक भूमिका मिळवण्याची शक्यता निर्माण केली आहे. (Chhatrapati Sambhajinagar Election Results 2026)
या निकालामुळे उद्धव ठाकरे यांना आणखी एक मोठा धक्का बसला असून छत्रपती संभाजीनगरमधील राजकारणाला नवी दिशा मिळण्याची शक्यता आहे. उर्वरित निकालांवर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.






