“छत्रपती संभाजी महाराज धर्मवीरच”

On: December 31, 2022 3:04 PM
Devendra fadnavis
---Advertisement---

मुंबई | विरोधी पक्षनेते अजित पवार(Ajit Pawar) यांनी शुक्रवारी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल मोठं वक्तव्य केलं होतं. पवार म्हणाले होते की, छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरून राज्य केलं नाही. ते धर्मवीर नव्हते.

या पवारांच्या वक्तव्यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnvis) यांनी उत्तर दिलं आहे. फडणवीस म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराजांनी धर्माचं रक्षण केलं आहे. राष्ट्रधर्म, स्वधर्म आणि हिंदू धर्म या तिन्ही धर्मांचं रक्षण त्यांनी केलं आहे.

धर्मांतर करणं हे त्यांनी कधीच मान्य केलं नाही. धर्मांतर न करता हालअपेष्टा सोसत त्यांनी बलिदान दिले, त्यामुळं ते धर्मवीरच होते असंही फडणवीस यावेळी म्हणाले आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या शरिराचे तुकडे झाले तरी त्यांनी स्वधर्म, स्वराष्ट्र आणि स्वराज्याची भाषा सोडली नाही, म्हणूनच अजित पवार आणि त्यांच्या सारखे विचार असलेल्या लोकांनी कितीही प्रयत्न केला तरीही छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य रक्षक तर होते पण धर्मवीरही होते, असं म्हणत त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

दरम्यान, बीडमध्ये व्यसनमुक्ती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीच्या समारोप प्रसंगी देवेंद्र फडणवीस हजर होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली .

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now