‘मला माहिती नसताना…’; छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

On: March 30, 2024 5:34 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

Chhagan Bhujbal | नाशिक लोकसभेच्या जागेवरून राष्ट्रवादी आणि शिंदे गटात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता याबाबत छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

छगन भुजबळ यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट

मला माहित नसताना नाशिकसाठी दिल्लीतून माझ्या नावाचा प्रस्ताव आला आहे, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी केला आहे. तिकीट मिळालं तर आपण नाशिकमधून लढण्यास तयार असल्याचं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

मला काहीच कल्पना नव्हती- छगन भुजबळ

मी तिकीटासाठी आग्रही नव्हतो. दिल्ली चर्चा झाली त्यात महाराष्ट्राबाबत माझ्या नावाची चर्चा झाली आहे. या चर्चेत माझं नाव पुढे आलं आहे. माझं नाव लोकसभेसाठी पुढे येईल याबाबत मला काहीच कल्पना नव्हती. वरिष्ठ पातळीवरून ठरलंय असं मला सांगितलं गेलं. मीही त्यांना मला एक दिवस द्या असं म्हटल्याचं छगन भुजबळांनी सांगितलं.

नाशिकमधून लढण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनी आग्रह धरला आहे. पण महायुतीचे नेते जो निर्णय देतील तो मला मान्य आहे. महायुतीसाठी आम्ही एकत्र काम करू. जागा राष्ट्रवादीला सुटली तर आम्ही घड्याळावरच लढू. मी लढणार असल्याची बॅनर्स गावागावात लागली आहे. मला त्याची माहिती मिळाली, अशी माहितीही त्यांनी दिली.

मी अजित पवार यांच्याशी चर्चा केली. माझ्या नावाची चर्चा सुरू आहे हे खरं आहे का? असं त्यांना विचारलं. त्यावर, तुम्हाला उभं राहवं लागले. आम्ही चाचपणी केली, असं अजितदादा म्हणाले. उभं राहायचं असेल तर आधी तयारी करतात. पण ही गोष्ट बाहेर गेली आणि नाशिकमध्ये चर्चा रंगली, असं भुजबळांनी सांगितलं.

नाशिकमधून लढण्यासाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे नाशिक मतदारसंघ कुणाकडे जाणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मुख्यमंत्र्यांचं सुद्धा ऐकलं नाही, अखेर ‘त्या’ एका फोनमुळे घेतली माघार!; शिवतारेंचा गौप्यस्फोट

फक्त एका दिवसात थेट हजार रुपयांनी वाढले सोन्याने भाव, जाणून घ्या आजचे दर

आनंदाची बातमी! बँक ऑफ इंडियामध्ये तब्बल ‘इतक्या’ पदांची भरती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नवी यादी जाहीर, 40 नावांचा समावेश

मऊ आणि गुलाबी ओठांसाठी ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now