Chhagan Bhujbal | राज्यसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रफुल पटेल यांची जागा रिक्त करण्यात आली. त्या जागेसंबंधीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal), त्याचप्रमाणे सुनेत्रा पवारांचं देखील नाव चर्चेत होतं. मात्र आता सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरला. त्यावर आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अनुभवी नेते आहेत. राष्ट्रवादी पुढे नेण्यासाठी इतर नेत्यांप्रमाणे छगन भुजबळांनी देखील काम केलं आहे. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी संधी दिली गेली. त्यांनी अर्ज देखील भरला. यामुळे आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) नाराज आहेत का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी मौन सोडलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ?
“अरे मी नाराज वगैरे नाहीये. आता पुढे बजेट सादर होणार आहे. काय काय करायचं थोडीशी चर्चा झाली पाहिजे. मी बिल्कुल नाराज नाहीये. माझ्या तोंडावर दिसतंय का मी नाराज आहे?”, असा प्रतिसवाल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे.
“तुम्हाला काय माहिती माझ्या मनात नेमकं काय दु:ख आहे? तुम्ही माझ्या मनात गेले आहात का? असं कसं होतं? पक्षात असं मागितलं जातं. कुणाला मिळत नाही तर कोणाला मिळतं. पक्षात जास्त शिस्त पाळावी लागते,” अशी भावना छगन भुजबळ यांनी व्यक्त केली आहे. यावर आता पटोलेंनी प्रतिक्रिया दिली असून छगन भुजबळ यांना डिवचलं आहे.
नाना पटोलेंची प्रतिक्रिया
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी छगन भुजबळ यांच्या नाराजीवर भाष्य केलं आहे. छगन भुजबळ यांना त्रास होत आहे हे आता कोणापासूनही लपलेलं नाही. ज्यांना अडीच वर्षे जेलमध्ये टाकलं भाजपने त्यांना सोबत घेतलं. जो ओबीसीचा चेहरा आहे त्यालाच टार्गेट करण्यात आलं असल्याचं आपण सातत्याने पाहिलं. ओबीसींचा मतांमध्ये कसा वापर करता येईल हे आता भाजप पाहतंय. हेचं होतंय. भुजबळांना त्रास होत आहे ते थीडच लपलेलं आहे, असं पटोले म्हणाले.
त्यांना अडीच वर्षे जेलमध्ये टाकलं. त्यांनाच भाजपने सोबत घेतलं. त्यावेळी भुजबळ हे डाकू होते. आता ते संन्याशी झाले आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.
News Title – Chhagan Bhujbal Reaction On Sunetra Pawar Filled Form Of Rajyasabha
महत्त्वाच्या बातम्या
ग्राहकांना दिलासा! सोनं झालं स्वस्त, चांदीच्या दरातही मोठी घसरण
मोठी बातमी! मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित, सरकारला नवा अल्टीमेटम
दोन आमदारांचे राजीनामे, आणखी चार आमदार राजीनामे देण्याच्या तयारीत
‘एक जण राजीनामा देतोय तर त्याचा…’; केतकी चितळेनं काढलं महायुती सरकारचं वाभाडं
कंगनाला कानाखाली मारल्याच्या घटनेवर अखेर करणने दिली प्रतिक्रिया, म्हणाला…






