‘निकाल आल्यावर 48 तासांच्या आत…’; छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य

On: November 23, 2024 9:05 AM
Chhagan Bhujbal big statement 
---Advertisement---

Chhagan Bhujbal | महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा असणार आहे. आज राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. सकाळी 8 वाजेपासूनच निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. त्यापूर्वीच अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. बंटेंगे तो कटेंगे’ महाराष्ट्रात चालले नाही, असे भुजबळ यांनी म्हटले आहे.तसेच, राज्यात महायुतीचे सरकार येणार, असा विश्वास देखील भुजबळ (Chhagan Bhujbal ) यांनी व्यक्त केलाय.

अनेक सर्व्हे करणाऱ्या संस्थांनी जनतेचा कल सांगितला आहे. त्यामुळे राज्यात महायुती सरकार बनवणार आहे. कोण म्हणते बहुमतापेक्षा महायुतीला दहा जास्ती असेल, कोण म्हणते पन्नास जागा जास्त असतील, पण महायुतीचे सरकार ही राज्यात बनणारच आहे. कारण, जनतेने मविआला नाकारले आहे, असंही भुजबळ म्हणाले आहेत.

काय म्हणाले छगन भुजबळ?

यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजनेवर देखील भाष्य केलं. महायुतीची लोकप्रिय योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण चालली आहे. शेतकऱ्यांना मोफत वीज हा विषय चालला आहे. महायुतीने जनतेसाठी अनेक योजना दिल्या आहेत, त्या योजनेच्या आधारावर महाराष्ट्रातील नागरिकांनी महायुतीला मतदान केले आहे, असं भुजबळ म्हणाले आहेत.

सरकार स्थापनेबाबतही छगन भुजबळ यांनी मोठा दावा केला आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल आल्यावर 48 तासांच्या आत आम्ही सरकार बनवणार आहोत, असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal ) म्हणाले आहेत. राज्यात राष्ट्रपती राजवटीची अजिबात शक्यता नाही, असंही त्यांनी ठामपणे सांगितलं.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली असून भाजपा आघाडीवर असल्याची माहिती मिळत आहे. सातारा जिल्ह्यातून  शिवेंद्रराजे भोसले आणि नागपूर दक्षिण पश्चिममधून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आघाडीवर आहेत. पहिल्या फेरीत महायुती आघाडीवर दिसून येत आहे.(Chhagan Bhujbal )

News Title :  Chhagan Bhujbal big statement 

महत्वाच्या बातम्या – 

कोण आघाडीवर कोण पिछाडीवर?, निकालाची प्रत्येक अपडेट पाहा एका क्लिकवर

आज महानिकाल! ‘या’ 20 मतदारसंघांवर अख्ख्या महाराष्ट्राची नजर, मोठी उलथापालथ होणार?

‘या’ 35 बंडखोरांचा निकाल करणार गेम?, महायुती-मविआची चिंता वाढली

पश्चिम महाराष्ट्रात कोण उधळणार विजयी गुलाल?, जाणून घ्या एका क्लिकवर

शनिदेवाच्या कृपेने आज ‘या’ राशींना राजकारणात मिळणार मोठं यश!

Join WhatsApp Group

Join Now