Uddhav Thackeray | आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात विविध मुद्यांवरुन आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडी व महायुतीमध्ये थेट सामना होणार आहे. त्यामुळे राजकीय नेते विविध जिल्ह्यात दौरे, मेळावे आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून जनतेमध्ये जात आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे हे दौरे करत केंद्रातील मोदी आणि राज्यातील महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत आहे. (Uddhav Thackeray )
रविवारी नागपूर येथील एका कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोचरी टीका केली होती. याला आता भाजपनेही जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांना भाजपचे आव्हान
चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान दिलं आहे. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रातील कुठल्याही विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवावी, आमदार होऊन नंतर आरोप करावे, असं आव्हानच बावनकुळे यांनी दिलं आहे. उद्धव ठाकरेंचा विदर्भ दौरा वैफल्यातून झाला आहे, असंही ते म्हणाले. (Uddhav Thackeray )
“मुख्यमंत्री म्हणूनही त्यांनी मागच्या दरवाज्याने आमदारकी मिळवली. याउलट देवेंद्र फडणवीस लोकनेते आहेत, ते पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्त्व कुणी स्वीकारायला तयार नाही. म्हणूनच त्यांचे आमदार बाहेर पडले.”, असा टोला बावनकुळे यांनी लगावला. ते काल माध्यमांशी संवाद साधत होते.
“उद्धव ठाकरेंची बाळसाहेबांचे सुपुत्र अशी एकमेव ओळख”
“उध्दव ठाकरे हे बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत,अशी एकमेव ओळख त्यांची आहे. मात्र, त्यांनी हिंदुत्वाचा विचार संपविला आहे. त्यामुळेच त्यांना काँग्रेससोबत जावे लागले आहे.”, अशी टीका देखील बावनकुळे यांनी केली. उद्धव ठाकरे काँग्रेस व शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाचा चेहरा करण्याची भीक मागत आहेत. त्यांना कुणी भीक घालत नाहीये, अशा शब्दांत बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. (Uddhav Thackeray )
News Title – Chandrashekhar Bawankule challenge to Uddhav Thackeray
महत्वाच्या बातम्या-
“गरबा खेळायला येणाऱ्या प्रत्येकाला गोमूत्र पाजा”; भाजप नेत्याचा अजब सल्ला
मोठी बातमी! सुपरस्टार रजनीकांत रुग्णालयात दाखल, नेमकं काय झालं?
दिवाळीपूर्वीच महागाईचा भडका! गॅस सिलिंडर महागले, काय आहेत नवे दर?
बाप्पाच्या आशीर्वादाने महिन्याची सुरुवात, पाहा तुमच्या राशीभविष्यात आज काय लिहिलंय?
धक्कादायक! भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याच्या मुलीच्या गाडीचा भीषण अपघात






