आपला कुठलाही देव बॅचलर नाही, महापुरुषही बॅचलर नाही- चंद्रकांत पाटील

On: January 13, 2023 1:57 PM
Chandrakant Patil
---Advertisement---

पुणे | आपला कुठलाही देव बॅचलर नाही. आपले कुठलेही महापुरुष बॅचलर नाही. संसार करुन सगळं करता येतं. सेवा देखील करता येते. जगात असा कुठलाही माणूस नाही ज्याच रक्त हिरवं किंवा निळं नाही, असं वक्तव्य चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलं आहे.

पुण्यात राष्ट्रीय युवा दिवसा निमित्ताने युवा संवाद कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी चंद्रकांत पाटील बोलत होते.

माणसाचा जन्म स्पर्मपासून होतो. स्पर्म दिसत देखील नाही. पण स्पर्म 100 किलोचा माणूस तयार करतो. त्यात माणूस कसा आहे हे ठरवतो. त्या स्पर्ममधून माणूस निर्माण करणारा कोणी तरी आहे ना?, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

सगळी माणसे त्याने वेगळी बनवली आहेत. त्याच्या स्पर्ममध्ये त्याने काय व्हायचंय हे ठरवलेलं असते, असं त्यांनी सांगितलं.

पूर्वी मुलंमुलीची टिंगल करायचे. आता मुली मुलांची टिंगल करतात. एसपी कॉलेजच्या कट्ट्यावर जायला मुलं आता घाबरतात, अशी मिश्किल टिप्पणीही त्यांनी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now