चंद्राबाबू यांच्या पत्नीची संपत्ती 579 कोटींनी वाढली; पाच दिवसांत नेमकं असं काय घडलं?

Chandrababu Naidu | एनडीए सरकारचे किंगमेकर तेलुगू देसम पक्षाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या संपत्तीत अवघ्या 5 दिवसांत 579 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या पाच दिवसांत असं नेमकं काय घडलं?, ज्यामुळे त्यांच्या संपत्तीमध्ये कोटींची भर पडली, याबाबत आता वेगवेगळ्या चर्चा रंगत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, एफएमसीजी क्षेत्रातील एका कंपनीच्या शेअरमध्ये झालेल्या वाढीमुळे भुवनेश्वरी देवी यांना मोठा धनलाभ झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये मोठी घसरण झाली होती.

चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नीच्या संपत्तीत कोटींची भर

पण, एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांच्या शेअरवर याचा काही फारसा फरक झाला नाही. मागील पाच दिवसांत हेरिटेज फूड्स लिमिटेड या कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची वाढ झाली. जानेवारी ते मार्च 2024 या तिमाहीतील शेअरहोल्डिंग यासाठी कारणीभूत ठरल्याचं म्हटलं जातंय.

चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी (Chandrababu Naidu) यांचा हेरिटेज फूड्स लिमिटेडमध्ये 24.37 टक्के हिस्सा आहे. त्यांच्याकडं कंपनीतील 2,26,11,525 शेअर्स आहेत.त्यामुळेच त्यांना तब्बल 579 कोटींचा फायदा झाला असल्याचं म्हटलं जातंय.

हेरिटेज फूड्सच्या शेअरमध्ये वाढ झाल्याने फायदा

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळं मंगळवारच्या शेअर बाजारातील घसरणीतही एफएमसीजीचा शेअर वधारला. हेरिटेज फूड्सच्या शेअरचा भाव आज तेजीसह उघडला आणि इंट्राडे उच्चांकी स्तर 659 रुपये प्रति शेअरवर पोहोचला. गेल्या सलग पाच सत्रात हेरिटेज फूड्सच्या शेअरच्या भावात 256.10 रुपयांची वाढ झाली.

त्यामुळेच एनडीमधील (Chandrababu Naidu) महत्वाचे नेते चंद्राबाबू नायडू यांच्या पत्नी नारा भुवनेश्वरी यांना मोठा फायदा झाला. हेरिटेज फूड्स लिमिटेडमध्ये 24.37 टक्के हिस्सा असल्याने त्यांची संपत्ती कोटी रुपयांनी वाढली.

News Title – Chandrababu Naidu wife earns 579 crore

महत्त्वाच्या बातम्या-

मुंबई भाजपात मोठा राजकीय भूकंप होणार?, ठाकरे गटाच्या दाव्याने खळबळ

बीडमधील वातावरण तापलं; पंकजा मुंडेंविषयीच्या ‘त्या’ पोस्टने खळबळ

एनडीएच्या नेतेपदी निवड झाल्यानंतर नरेंद्र मोदी भावूक, म्हणाले ‘ही माझी कमाई’

शिंदे गटातील आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात; नव्या दाव्याने खळबळ

“राज ठाकरे बोलले उड्या मारा तर मारणार, थांबा बोलले तर थांबणार”