चक्क खासदारानं मॅालमधून चोरले कपडे, पाहा कसा CCTV मध्ये कैद झाला कपडेचोर खासदार

On: January 18, 2024 5:26 PM
CCTV
---Advertisement---

CCTV | न्यूझीलंडमधील ग्रीन पार्टीच्या खासदार गोलरिज घरमन (golriz ghahraman) यांच्यावर दोन शॉपिंग स्टोअरमधून तीन वेळा कपडे चोरल्याचा आरोप करण्यात आला आहे. या आरोपानंतर त्यांनी सोमवारी आपल्या खासदार पदाचा राजीनामा दिला. घरमन यांच्या चोरीचा व्हिडीओ (CCTV) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याप्रकरणी त्या म्हणाल्या की, कामाच्या ताणामुळे मी अस्वस्थ झाले आणि जे काही घडले ते त्या तणावाचा परिणाम आहे. तसेच मी मान्य करते की, मी माझ्या लोकांना कमी लेखले, त्यांच्या अपेक्षेप्रमाणे मी वागली नाही. याबद्दल मी माफी मागते.

दरम्यान, ऑकलंड आणि वेलिंग्टनमधील स्टोअरमधून कपडे चोरल्याचा गोलरिज यांच्यावर आरोप आहे. पोलिसांनी या दुकानातील व्हिडीओ फुटेज (CCTV) मिळवले आहे. आता गोलरिज यांच्याविरोधात चौकशी सुरू झाली आहे. ‘वोक्स न्यूज’ या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, गोलरिज या मूळच्या इराणी आहेत. त्यांनी देशात आणि परदेशात मानवाधिकारांच्या मुद्द्यांवर खूप काम केले आहे. 2017 मध्ये त्या न्यूझीलंड सरकारमध्ये स्थान मिळवणाऱ्या पहिल्या निर्वासित ठरल्या. त्यांना न्यायमंत्री करण्यात आले. गोलरिज यांच्या जागी आता आणखी एका महिला खासदाराला संधी दिली जाईल, असे ग्रीन पार्टीकडून सांगण्यात आले आहे.

इराणमधून पळून न्यूझीलंड गाठले

42 वर्षीय गोलरिज यांचे कुटुंब सुमारे 30 वर्षांपूर्वी इराणमधून पळून न्यूझीलंडमध्ये आले होते. यानंतर त्यांना येथील नागरिकत्व देखील मिळाले. मात्र, आजतागायत पोलिसांनी त्यांच्यावर आरोपपत्र तयार केलेले नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये (CCTV) पाहायला मिळते की, गोलरिज यांच्या हातात ब्रँडेड हँडबॅग आहे, त्या लोकांची नजर चुकवून काही कपडे पिशवीत टाकतात आणि तिथून निघून जातात.

CCTV फुटेज व्हायरल

पोलिसांनी सांगितले की, गोलरिज या एक खासदार आहेत. प्रत्येकजण अशा लोकांकडून जबाबदार वर्तनाची अपेक्षा करतो जेणेकरून ते एक आदर्श ठेवू शकतील. पण, गोलरिज या खासदार म्हणून जनतेच्या अपेक्षांवर खऱ्या ठरल्या नाहीत. पोलिसांच्या विधानावर गोलरिज यांनी म्हटले, “चूक कशामुळे झाली हे मला माहीत आहे. मानसिक तणावामुळे मी अशी चूक केली आहे.”

 

ग्रीन पार्टीने दिले स्पष्टीकरण

ग्रीन पार्टीचे नेते जेम्स शॉ यांनी सांगितले की, मी गोलरिज यांचा बचाव करू शकत नाही. पण मी हे सांगायलाच हवे की, जेव्हापासून त्या खासदार आहेत, तेव्हापासून त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या येत आहेत. यामुळे त्या खूप तणावाखाली होत्या. या कारणावरून ही घटना घडली असावी. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. गोलरिज यांना खूप तणावाचा सामना करावा लागला आणि तोही खासदार झाल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच. अशा धमक्या कोणी आल्यास तो मानसिक दडपणाखाली जातो हे साहजिकच आहे.

2021 मध्ये एका मुलाखतीत गोलरिज म्हणाल्या होत्या की, मला ऑनलाइन आणि ऑफलाइन धमक्या येत आहेत. माझा जीव धोक्यात आहे. यानंतर मला घरात धोक्याचा अलार्म लावावा लागला होता. अलीकडेच जेव्हा मी पॅलेस्टाईनच्या बाजूने रॅली काढली तेव्हा प्रकरण अधिकच चिघळले अन् तेव्हाही मला धमकीचे फोन आले.

News Title- CCTV New Zealand MP stole clothes from warehouse
महत्त्वाच्या बातम्या –

15 वर्षाच्या मुलासोबत शिक्षिकेनं ठेवले शारीरिक संबंध, असले मेसेज समोर आल्याने उडाली खळबळ

Rohit Sharma | आधीच 2 वेळा शून्यावर आऊट झालोय, त्यात तू… अंपायरवर भडकला रोहित शर्मा

Rohit Sharma | मी एकटाच पुरेसा आहे! अफगाणिस्ताननं अनुभवलं रोहित शर्मा नावाचं वादळ!

IND vs AFG | बलाढ्य टीम इंडियाला अफगाणिस्तानने फोडला घाम, डबल सुपर ओव्हरपर्यंत नेला सामना

Video | अबब! रोहित-रिंकू अक्षरशः तुटून पडले, शेवटच्या ओव्हरमध्ये रेकॅार्डब्रेक धावांचा पाऊस

Join WhatsApp Group

Join Now