मोठी बातमी! अभिनेता अक्षय कुमारच्या नावे तरुण मुलीची फसवणूक

On: April 11, 2024 4:07 PM
Akshay Kumar
---Advertisement---

Akshay Kumar | अभिनेता अक्षय कुमारच्या नावे फसवणुकीचा प्रयत्न करण्यात आला आहे. अक्षयच्या नावाने एका तरुणीला फसवण्याचा प्रयत्न झाल्याची घटना घडली आहे. आजकाल फसवणूक करण्याचे प्रकार खूप वाढले आहेत. यात, मोठ्या व्यक्तींच्या नावाचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. त्यात आता खिलाडी कुमारचे नाव आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

अखेर या तरुणीने विलंब न करता थेट अक्षय कुमारच्या मॅनेजरशी संपर्क साधला तेव्हा तिला फसवणूक होत असल्याचे लक्षात आले. तिने या भामट्याचे बिंग फोडले आणि जुहू पोलिसांनी त्याला अटक केली आहे. हे प्रकरण आता चर्चेत आले आहे.

अक्षय कुमारच्या नावे फसवणूक

फसवणूक झालेल्या तरुणीचे नाव पूजा आनंदानी असून ती खार परिसरात राहते. 3 एप्रिलला तिला एका व्यक्तीचा फोन आला. ‘केप ऑफ गुड होप फिल्स’ या अभिनेता अक्षय कुमारच्या (Akshay Kumar) कंपनीतून बोलत असून आपले नाव रोहन मेहरा असल्याचे त्याने सांगितले.

नेमकं काय घडलं?

पुढे या व्यक्तीने पूजाला थेट अभिनयाची ऑफर दिली. निर्भया केसवर आधारित एक चित्रपट येत असून महत्वाच्या भूमिकेसाठी तुमची निवड करण्यात आल्याचे त्या व्यक्तीने पूजाला सांगितले. तसेच त्याने पूजाला विलेपार्ले येथील इस्कॉन मंदिराजवळ भेटण्यासाठी बोलावले. प्रत्यक्ष भेटीच्या वेळी आरोपीने सोबत पटकथा लिहून आणली होती. खाली अभिनेता अक्षय कुमारची (Akshay Kumar) स्वाक्षरी असल्याचेही त्याने नमूद केले.

या चित्रपटात अक्षयसोबतच इतरही मोठे कलाकार असल्याची माहिती त्याने पूजाला दिली. तसेच, पटकथेतील इतर कोणतीही स्त्री पात्र निवड, असा ऑप्शन पूजाला देण्यात आला. तिने यापैकी एक ऑप्शन निवडला.पण, पुढे त्याने अभिनेते अमिताभ बच्चन यांच्या छायाचित्रकाराकडून फोटो काढण्याचा सल्ला देत पूजाकडे 6 लाखांची मागणी केली. रक्कम मोठी असल्याने घरच्यांशी बोलून सांगते, असं पूजाने सांगितलं.

घरी आल्यावर पूजाने अक्षय कुमारचा स्वीय सहाय्यक झिनोबिया कोहला याच्याशी संपर्क साधत चौकशी केली. तेव्हा तिला समजलं की, रोहन मेहरा नावाची कोणतीच व्यक्ती केप ऑफ गुड होप्स मध्ये काम करत नाही. फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तिने भामट्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर रोहन मेहराने तिला पुन्हा कॉल करत भेटण्याची मागणी केली आणि याचवेळी पोलिसांनी त्याला अटक केली. या भामट्याचं खरं नाव प्रिन्सकुमार राजन सिन्हा असल्याचे निष्पन्न झाले. आरोपीला याप्रकरणी अटक करण्यात आलीआहे. तसेच त्याच्याविरोधात फसवणूक आणि तोतयागिरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title- case registered for cheating a young woman using Akshay Kumar name

महत्वाच्या बातम्या-

आता घरबसल्या पैसे काढता येणार? कसे वापरायचे, जाणून घ्या सर्व काही

राशीद खान ठरला गेमचेंजर; गुजरातचा रोमहर्षक विजय

या दोन राशींना अचानक धनलाभ होण्याची शक्यता

‘आमची फसवणूक केली’; शेतकऱ्यानं विचारला जाब, चंद्रकांत पाटलांनी सभा गुंडाळली

‘…म्हणून बोलणी फिसकटली’; भाजप-शिवसेनेकडून मोठा खुलासा

Join WhatsApp Group

Join Now