BSNL 5G Phone l भारतातील खाजगी दूरसंचार कंपन्यांनी म्हणजेच रिलायन्स जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी जुलै 2024 पासून पोस्टपेड आणि प्रीपेड रिचार्जच्या किमतींमध्ये मोठी वाढ केली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांच्या खिशावर मोठा परिणाम झाला असून लाखो वापरकर्ते Jio, Airtel आणि Vi सारख्या कंपन्या सोडून BSNL सोबत हातमिळवणी करत असल्याचे दिसून आले आहे.
बीएसएनएल घेणार फायदा :
अशातच भारतातील सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ही स्वतःसाठी सुवर्णसंधी म्हणून घेतली आहे. एकीकडे खाजगी कंपन्या लोकांना महागडे प्लॅन विकत आहेत, तर दुसरीकडे सरकार BSNL ग्राहकांना स्वस्त रिचार्ज प्लॅनचे आमिष दाखवत आहे.
एवढेच नाही तर BSNL आपले 4G नेटवर्क झपाट्याने देशभरात वाढवण्याचे काम करत आहे. BSNL लवकरात लवकर 5G सुरू करण्याच्या तयारीत आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि दूरसंचार मंत्री यांनी बीएसएनएलच्या विस्तारात प्रामुख्याने लक्ष घातल्याचे दिसत आहे.
BSNL 5G Phone l BSNL 5G फोन बाजारात येणार? :
अशा परिस्थितीत सध्या सोशल मीडियावर बीएसएनएलबद्दल अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत, ज्यांना पाहून लोक गोंधळात पडले आहेत. या अफवांपैकी एक म्हणजे BSNL लवकरच आपला 5G फोन लॉन्च करणार आहे, ज्यामध्ये 200MP कॅमेरा, 7000mAh बॅटरी तसेच BSNL ची सुपरफास्ट 5G कनेक्टिव्हिटी असणार आहे.
मात्र BSNL 5G फोनबद्दल चुकीची माहिती आपल्या अधिकृत X हँडलवरून पोस्ट करून बीएसएनएलनेच नाकारली आहे. BSNL ने X वर पोस्ट केले आहे की खोट्या बातम्यांना बळी पडू नका. तसेच BSNL संदर्भात सर्व माहितीसाठी अधिकृत पेजला भेट द्या.
News Title : BSNL 5G Smartphone
महत्त्वाच्या बातम्या-
शेअर बाजारातील मोठ्या घडामोडीनंतर सोन्याचे दर काय?
सर्वसामान्यांचं बजेट कोलमडलं; ऐन श्रावणात भाज्यांचे दर भिडले गगनाला
“राहुल गांधी अत्यंत खतरनाक, विध्वंसक असून ते कधीच पंतप्रधान..”; कंगना रनौतचा संताप
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! अर्ज करण्यासाठी ‘या’ लिंकवर क्लिक करा
हिंडनबर्गच्या रिपोर्टनंतर अदानी ग्रुपच्या शेअर्सना मोठा झटका; कोट्यवधी रुपये बुडाले






