मुंबईच्या महापौर पदाचा सस्पेन्स संपला? राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी

On: January 18, 2026 2:32 PM
Mayor Election (1)
---Advertisement---

BMC Mayor Election | मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर महापौरपदावरून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असतानाही महापौरपद कोणाकडे जाणार, याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath shinde) यांच्या शिवसेनेला अडीच वर्षे महापौरपद मिळणार, अशा चर्चांनी राजधानीत वातावरण तापले होते. मात्र आता या विषयावर भाजपाकडून मोठी प्रतिक्रिया समोर आली आहे.

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “बहुमत हे चंचल असतं, आज असतं उद्या नसतं,” असे विधान करत मुंबईतील सत्तासमीकरण बदलण्याचे संकेत दिले होते. त्यामुळे महाविकास आघाडीही महापौरपदासाठी हालचाली करत असल्याची चर्चा होती. अशा पार्श्वभूमीवर शिंदे गट भाजपकडे अडीच-अडीच वर्षे महापौरपद वाटून घेण्याचा प्रस्ताव देत असल्याचे बोलले जात होते.

शिंदे गटाकडून प्रस्तावच नाही – बावनकुळे :

या चर्चांवर भाजपाचे नेते व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “शिंदे यांच्या शिवसेनेकडून भाजपकडे महापौरपदाबाबत कोणताही प्रस्ताव आलेला नाही. या सगळ्या चर्चा केवळ अफवा आहेत,” असे त्यांनी सांगितले. त्यामुळे अडीच-अडीच वर्षांच्या महापौरपदाच्या चर्चेला सध्या पूर्णविराम मिळाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, शिंदे गटाचे सर्व निवडून आलेले नगरसेवक मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये थांबले असल्याने ‘हॉटेल पॉलिटिक्स’ची चर्चा रंगली होती. यावरही बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी स्पष्टीकरण देत “हे केवळ गेट टुगेदर असून त्यात काहीही गैर नाही,” असे स्पष्ट केले आहे.

BMC Mayor Election | संजय राऊतांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर :

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गट व भाजपवर नगरसेवकांना ‘डांबून ठेवण्याचा’ आरोप केला होता. यावर बावनकुळे यांनी आक्रमक प्रत्युत्तर देत, “राऊत यांनी आधी स्वतःचे आमदार सांभाळावेत. जे आमदार सांभाळू शकले नाहीत ते नगरसेवक काय सांभाळणार?” असा टोला लगावला. तसेच, “आम्हाला हॉटेल पॉलिटिक्स करण्याची गरज नाही. आम्ही आमचे कार्यकर्ते व्यवस्थित सांभाळतो,” असेही त्यांनी स्पष्ट केले.

सध्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) दावोस दौऱ्यावर असतानाही मुंबईतील सत्तासमीकरणावर लक्ष ठेवले जात आहे. महायुतीतील जागावाटप आणि नेतृत्वावर अंतिम निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईचा पुढचा महापौर भाजपचा असणार की शिंदे गटाचा, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

News Title: BMC Mayor Election: Will Shinde Get Mayor for 2.5 Years? Big Update Revealed

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now