काळे डाग असलेला कांदा खातायं? तर होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार

On: December 11, 2025 1:41 PM
Black spots on onion
---Advertisement---

Black spots on onion | किचनमधील सर्वात जास्त वापरला जाणारा घटक म्हणजे कांदा. भाज्या, आमटी, उसळी, कोशिंबीरपासून ते ग्रेव्हीपर्यंत प्रत्येक पदार्थाला खास चव देण्यासाठी कांद्याचा वापर होतो. व्हिटॅमिन सी, फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि सल्फर संयुगांमुळे कांदा आरोग्यासाठी लाभदायक असल्याचेही अनेक संशोधनातून समोर आले आहे. मात्र बाजारातून कांदा खरेदी करताना एक छोटीशी चूक तुमच्या किडनीला गंभीर नुकसान पोहोचवू शकते, असा तज्ञांचा इशारा आहे. (Black spots on onion)

घराबाहेर बऱ्याच काळ साठवून ठेवलेल्या कांद्यावर अनेकदा काळ्या रेषा किंवा काळपट डाग दिसतात. काही वेळा हे डाग पाण्याने धुतल्यावर कमी दिसतात, परंतु तरीही असे कांदे खाणे आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. कारण हा साधा डाग नसून एक प्रकारची बुरशी असून त्यातून निर्माण होणारे विष मूत्रपिंड आणि यकृतासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे अशा कांद्याबाबत अधिक जागरूक राहणे आवश्यक आहे.

काळे डाग म्हणजे नक्की काय? तज्ज्ञांचे मत काय सांगते? :

तज्ञांच्या मते कांद्यावर दिसणारे काळे डाग हे साधे डाग नसतात. हे अॅस्परगिलस नायजर नावाच्या बुरशीमुळे होतात, जी मातीत आढळणारी सामान्य बुरशी आहे. या बुरशीच्या काही प्रकारांमधून ऑक्रॅटॉक्सिन ए नावाचे मायकोटॉक्सिन तयार होते, जे किडनी आणि लिव्हरचे नुकसान करू शकते. त्यामुळे काळे डाग असलेला कांदा खाल्ल्यास शरीरावर विपरीत परिणाम होण्याची भीती वाढते.

सर्वच डाग असलेल्या कांद्यांमध्ये हे विष आढळते असे नाही, परंतु तरीही काळजी म्हणून असे कांदे खाऊ नयेत, असा सल्ला दिला जातो. अशा कांद्याचा बाह्य थर काढून फेकून दिल्यास आतला भाग सुरक्षित असू शकतो. मात्र काळे डाग जास्त प्रमाणात असतील तर तो संपूर्ण कांदा टाकून देणे योग्य आहे.

Black spots on onion | कांद्याचे फायदे आणि दैनंदिन आहारातील महत्त्व :

कांदा हा भारतीय स्वयंपाकातील अविभाज्य भाग असून त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. कांद्यातील व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6 आणि सल्फर संयुगे रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. कच्चा कांदा खाल्ल्याने पचनशक्ती सुधारते, भूक वाढते आणि आतड्यांची स्वच्छता होते. बद्धकोष्ठतेवरही कांदा लाभदायक मानला जातो.

हृदयाच्या आरोग्यासाठीही कांदा फायदेशीर असून तो कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतो. रक्तदाब नियंत्रित ठेवणे, रक्ताभिसरण सुधारवणे आणि हृदयरोगाचा धोका कमी करणे या सर्व गोष्टींमध्ये कांदा उपयुक्त ठरतो. मधुमेहींसाठीही कांदा लाभदायक असून तो रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यास सहाय्य करतो. (Black spots on onion)

कांदा जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होऊ शकते? :

कांदा गुणकारी असला तरी अती प्रमाणात खाल्ल्यास काही त्रास उद्भवू शकतात. जास्त किंवा कच्चा कांदा खाल्ल्यास गॅस, आम्लपित्त, पोटदुखी आणि छातीत जळजळ होण्याचा त्रास वाढू शकतो. पचनसंस्थेवर ताण येत असल्याने अल्सर किंवा अॅसिडिटी असलेल्या व्यक्तींनी कच्चा कांदा टाळणे अधिक सुरक्षित आहे. (ochratoxin A)

काही लोकांना कांद्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते किंवा डोकेदुखी, चक्कर येणे असे दुष्परिणाम जाणवतात. कांदा रक्त पातळ करण्याचे काम करतो, त्यामुळे शस्त्रक्रिया होणार असलेल्या रुग्णांनी किंवा रक्तस्रावाचा त्रास असलेल्या लोकांनी कांदा कमी प्रमाणात खावा. गर्भवती महिला आणि लहान मुलांनीही कांदा मर्यादित प्रमाणातच सेवन करावा.

कांदा योग्य पद्धतीने साठवणे का महत्त्वाचे? :

बराच काळ कांदे चांगले टिकून राहावेत यासाठी त्यांचे योग्य साठवण महत्त्वाची आहे. कांदे नेहमी बटाट्यांपासून वेगळ्या, गडद, थंड आणि हवेशीर ठिकाणी ठेवावेत. चुकीच्या साठवणीमुळे आर्द्रता वाढते आणि त्यामुळे बुरशीची वाढ होऊन काळे डाग निर्माण होऊ शकतात. अशा परिस्थितीत ते खाणे टाळावे.

कांदा हा स्वस्त, सहज उपलब्ध आणि पोषक तत्वांनी समृद्ध घटक आहे. मात्र काळे डाग असलेले कांदे टाळून, स्वच्छ आणि सुरक्षित कांदे वापरल्यासच त्याचा खरा फायदा मिळू शकतो. त्याचा उपयोग करताना समतोल राखल्यास कांदा आरोग्यासाठी वरदान ठरतो.

News Title: Black spots on onions: Are they dangerous? Expert explains kidney and liver risks

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now