राजकीय वर्तुळात खळबळ! भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यासह दोघांची निर्घृण हत्या

On: August 12, 2025 12:57 PM
BJP
---Advertisement---

BJP | भिवंडीतील खारबाव चिंचोटी रस्त्यावरील खार्डी गावात सोमवारी रात्री उशिरा भीषण हत्याकांड घडले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल तांगडी (Prafull Tangadi) आणि त्यांचा सहकारी तेजस तांगडी यांची चार ते पाच हल्लेखोरांनी धारदार शस्त्रांनी निर्घृणपणे हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

कार्यालयात घडली रक्तरंजित घटना :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास प्रफुल्ल तांगडी (Prafull Tangadi) आपल्या दोन सहकाऱ्यांसोबत ‘जे डी टी इंटरप्रायसेस’ या कार्यालयात बसले होते. यावेळी चार ते पाच हल्लेखोर अचानक आत घुसले आणि धारदार शस्त्रांनी प्रफुल्ल व तेजस तांगडी यांच्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झाल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले.

या घटनेतील धक्कादायक बाब म्हणजे, सुमारे एक वर्षापूर्वी प्रफुल्ल तांगडी यांच्यावर अशाच पद्धतीने जीवघेणा हल्ला झाला होता, मात्र तेव्हा ते बचावले होते. यावेळी मात्र हल्लेखोरांनी कुठलाही चूकवण्याचा मौका न देता त्यांचा जीव घेतला.

BJP | राजकीय वाद की वैयक्तिक वैर? :

प्रफुल्ल तांगडी हे भाजप युवा मोर्चाचे सक्रिय कार्यकर्ते आणि जिल्हा उपाध्यक्ष होते. त्यांची राजकीय पार्श्वभूमी असल्याने ही हत्या वैयक्तिक वादातून झाली की राजकीय वैमनस्यातून, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार केली आहेत. घटनास्थळाचा पंचनामा करून तपासाची दिशा ठरवली जात आहे.

हत्येनंतर खार्डी गाव व परिसरात तणाव पसरला असून, नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून गावात गस्त वाढवली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळातही या हत्याकांडाची जोरदार चर्चा आहे.

News Title: BJP Yuva Morcha District Vice President Prafull Tangdi and Associate Brutally Murdered in Bhiwandi; 4-5 Attackers on the Run

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now