उमेदवारी न मिळाल्याने नगरमध्ये नाराजी नाट्य; भाजपचा बडा नेता बंडाच्या तयारीत?

On: October 21, 2024 1:18 PM
BJP Satyajit Kadam upset about not getting the nomination
---Advertisement---

BJP | विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने काल (20 ऑक्टोबर) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये 99 नावे आहेत. यावेळी काही नवीन चेहऱ्यांना देखील भाजपने संधी दिली आहे. मात्र, यादी जाहीर होताच भाजपात नाराजी नाट्य सुरू झाल्याचं चित्र आहे. अनेक ठिकाणी उमेदवारी न मिळाल्याने नेत्यांकडून नाराजी जाहीर केली जात आहे. आता अहमदनगरमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. (BJP)

नगरमधील राहुरी विधानसभा मतदारसंघात शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी दिल्यामुळे कदम परिवार नाराज झाला आहे. कदम परिवाराने भाजपविरोधात बंडाची भूमिका घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून भाजपात असलेला कदम परिवार तिकीट न मिळाल्याने नाराज झाला आहे. राहुरी या मतदारसंघात भाजपकडून सत्यजित कदम इच्छुक होते. मात्र, येथे शिवाजी कर्डीले यांना उमेदवारी मिळाली आहे. त्यामुळे सत्यजित कदम आणि त्यांचे वडील माजी आमदार चंद्रशेखर कदम हे नाराज झाले आहेत.

सत्यजित कदम आणि चंद्रशेखर कदम यांच्यात नाराजी

“खुपवेळा पक्षाचा आदेश मानून निवडणुकीतून माघार घेतली होती. मात्र आता कार्यकर्ते जे सांगतील त्यानुसार निर्णय घेणार”, अशी स्पष्ट भूमिकाच सत्यजित कदम यांनी घेतली आहे. त्यामुळे कदम परिवार आता भाजपविरोधात बंड करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत चंद्रशेखर कदम यांनी आपला मुलगा सत्यजित यांच्यासाठी पक्षाकडे राहुरी विधानसभेची मागणी केली होती. मात्र तेव्हा देखील पक्षाने त्यांची समजूत काढत ही जागा शिवाजी कर्डिले यांनी दिली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्राजक्त तनपुरे यांच्याविरोधात कर्डिले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. (BJP)

श्रीगोंदातही नाराजी नाट्य

आता होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्यजित कदम यांनी पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली. मात्र, पुन्हा एकदा ही जागा शिवाजी कर्डिले यांना देण्यात आल्याने कदम पिता-पुत्र हे नाराज झाले आहेत. त्यामुळे कदम परिवार आता भाजप विरोधात दंड थोपटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, अहमदनगरच्या आणखी एका मतदारसंघात देखील नाराजी नाट्य दिसून येत आहे. जिल्ह्यातील श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपकडून इच्छुक असलेल्या सुवर्णा पाचपुते यांना उमेदवारी न मिळाल्याने त्या प्रचंड नाराज झाल्या असून त्यांनी आता अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाजपला धक्क्यावर धक्के बसत आहेत.  (BJP)

News Title : BJP Satyajit Kadam upset about not getting the nomination

महत्वाच्या बातम्या –

दिवाळीला पोत्यानं पैसे घ्या… ‘या’ नेत्याच्या विधानाने चर्चांना उधाण

अखेर जरांगे पाटलांचा राजकारणात प्रवेश, ‘या’ जागांवर देणार उमेदवार

शनीची चाल करणार कमाल, दिवाळीपासून ‘या’ राशींचा सुवर्णकाळ सुरू होणार!

शरद पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर; कोणाकोणाला मिळणार संधी?

‘अजितदादांनी शब्द फिरवला’; भाजपाची यादी जाहीर होताच समर्थकांची बंडाची भूमिका

Join WhatsApp Group

Join Now