तुळजापुरात दोन गट भिडले! भाजप आमदाराच्या पीएचे नाव समोर

On: December 18, 2025 12:10 PM
Tuljapur Firing Case
---Advertisement---

Tuljapur Firing Case | तुळजापूर शहरात दोन गटांमध्ये झालेल्या वादानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणाने मोठे वळण घेतले असून या राड्यात भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या स्वीय सहाय्यकाचे नाव समोर आले आहे. या घटनेनंतर शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

काँग्रेसचे उमेदवार अमर कदम यांनी आरोप केला आहे की, भाजप आमदारांचे स्वीय सहाय्यक जयेश कदम हे भाजप नगराध्यक्षपदाचे उमेदवार पिटू गंगणे यांच्यासोबत तुळजापूर-नळदुर्ग रस्त्याच्या कामावर गेले असता त्यांच्या नातेवाइकांना जाणीवपूर्वक शिवीगाळ करण्यात आली. ही शिवीगाळ मुद्दाम छेड काढण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप अमर कदम यांनी केला असून त्यामुळे या राडा प्रकरणात आमदारांच्या पीएचे नाव थेट जोडले जात आहे.

भाजपकडून आरोप फेटाळले, राजकीय षड्यंत्राचा आरोप :

दरम्यान, भाजपने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. भाजपकडून सांगण्यात आले की, रस्ते कामाच्या पाहणीसाठी गेले असताना महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचे तिथे येण्याचे प्रयोजन काय, असा सवाल उपस्थित करण्यात आला. कामाच्या दर्जाबाबत विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी या घटनेला राजकीय षड्यंत्राचा रंग दिला जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. (Tuljapur Firing Case)

या घटनेदरम्यान ऋषी मगर आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून शिवीगाळ झाल्याचे भाजपचे म्हणणे आहे. घडलेली घटना दुर्दैवी असून त्याचे समर्थन कोणीही करणार नाही, असे स्पष्ट करत आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी प्रशासनाला कठोर कारवाईचे आदेश दिल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. मात्र, हा वाद जाणीवपूर्वक चिघळवून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोपही भाजपने केला आहे.

Tuljapur Firing Case | गावठी कट्टे आणि कोयत्यांच्या वापरावर प्रश्नचिन्ह :

या संपूर्ण प्रकरणानंतर तुळजापुरात गावठी कट्टे वापरण्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. अमर कदम यांनी आरोप केला की, आचारसंहिता लागू असताना परवाना असलेली शस्त्रे जमा केली जातात, मात्र हातात कोयते आणि गावठी कट्टे घेऊन दहशत निर्माण करण्यात आली. या राड्यात कोयत्याने हल्ला करण्यात आला असून गोळीबारही झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या हल्ल्यात अमर कदम यांचे भाऊ कुलदीप कदम यांच्या मानेवर कोयत्याने वार करण्यात आला असून त्यांच्यावर सध्या सोलापुरात उपचार सुरू आहेत. गोळीबाराच्या घटनेनंतर तुळजापुरातील ड्रग्ज तस्करीच्या मुद्द्यानंतर आता गावठी कट्टे वापराचा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणात दोन संशयितांना ताब्यात घेतले असून कुलदीप मगर यांच्या तक्रारीवरून आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

News Title : BJP MLA’s PA Named in Tuljapur Clash, Country-Made Pistols Issue Heats Up

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now