“नेहरू सिगरेट ओढायचे, गांधीजींचा मुलगाही ड्रग्ज घ्यायचा”

On: December 15, 2022 12:32 PM
---Advertisement---

मुंबई | नेहरू (Nehru) ड्रग्ज घेत होते तर गांधी (Gandhi) दारू पीत होते, असं वक्तव्य केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी केलं आहे.

देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू ड्रग्ज सेवन करायचे. एवढंच नाही तर महात्मा गांधींच्या एका मुलाबाबतही त्यांनी असाच दावा केला. एएनआय या वृत्तसंस्थेने त्याचा व्हिडीओ शेअर केला आहे.

जवाहरलाल नेहरू ड्रग्ज घेत असत, सिगारेट ओढत असत आणि महात्मा गांधींचा एक मुलगा ड्रग्स घेत असे. याबात वाचून बघा तुम्हाला खरी माहिती मिळेल. अमली पदार्थांमुळे जगासह आपल्या देशाला पूर्णपणे काबीज केलं आहे, असंही ते म्हणालेत.

केंद्रीय मंत्री कौशल किशोर यांनी अंमली पदार्थांच्या विरोधात आवाज उठवत आहेत. त्यांच्या ट्विटर हँडलवरून असं दिसून येतं की ते नेहमी ड्रग्जच्या विरोधात लोकांना जागरूक करत असतात. यापूर्वी मंत्री कौशल किशोर यांनी ट्विट करून लोकांना ड्रग्ज सोडण्याचं आवाहन केलं होतं.

महत्त्वाच्या बातम्या-

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now