पहिल्या यादीत दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट; पाहा कोणाचं तिकीट कापलं

On: October 20, 2024 4:32 PM
BJP candidate List
---Advertisement---

BJP candidate List | विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhansabha Election) भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी (BJP candidate First List) जाहीर केली आहे. भाजपने एकूण 99 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली आहे. या यादीमध्ये पक्षाकडून आधीच्याच सर्व आमदारांना पुन्हा एकदा संधी दिल्याचं दिसून येत आहे.

दोन विद्यमान आमदारांचा पत्ता कट

भाजपच्या पहिल्या यादीमध्ये दोन विद्यमान आमदारांना धक्का दिलाय. पूर्वीच्या दोन आमदारांचं तिकिट कापण्यात आलं आहे. यातकामठी मतदारसंघामध्ये भाजपचे टेकचंद सावरकर हे आमदार होते. मात्र यावेळी त्यांचा पत्ता कट करण्यात आला असून, त्यांच्याजागी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे आता निवडणूक लढवणार आहेत.

दुसरीकडे पुण्यातील चिंचवड विधानसभा मतदार संघातून अश्विनी जगताप यांच्याऐवजी भाजपकडून शकंर जगताप हे निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत.

पुण्यातील महत्त्वांच्या मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदारांव्यतिरिक्त अनेक नेते निवडणूक लढवण्यात इच्छुक होते, मात्र पक्षांने ही जबाबदारी ज्या-त्या मतदारसंघातील विद्यमान आमदारांच्या खांद्यावर टाकली आहे. चिंचवड वगळता बाकी मतदारसंघात विद्यमान आमदारांना संधी दिली आहे.

गणपत गायकवाड यांचंहू विधानसभेचं तिकीट देखील कापलं गेलं आहे. असं असलं तरी भाजपने गायकवाड यांना दिलासा दिला आहे. कारण भाजपकडून गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

सुरक्षित असणाऱ्या जागांचा भाजपाने आपल्या पहिल्या यादीत समावेश केला आहे. या यादीत भाजपा महाराष्ट्राचे भाजपाचे सर्वोच्च नेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘या’ भाजप नेत्याच्या लेकीला मिळालं तिकीट, पाहा कोणत्या मतदारसंघातून लढणार

सर्वात मोठी बातमी! भाजपची उमेदवारांची पहिली यादी जाहीर, कुणाकुणाला संधी?

मोठी बातमी! नवनीत राणा यांचं राजकीय पुनर्वसन होणार?

लॉरेन्स बिश्नोईच्या चुलत भावाचा सर्वात मोठा खुलासा!

छत्रपती संभाजीनगमध्ये मोठी घडामोड; मनोज जरांगेंची ताकद वाढली

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now