Bigg Boss Marathi Season 6 | मराठी मनोरंजनविश्वातील सर्वात मोठ्या रिअॅलिटी शोपैकी एक असलेल्या बिग बॉस मराठीच्या सहाव्या पर्वाची अखेर अधिकृत तारीख जाहीर झाली आहे. नव्या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, “स्वागताला दारं उघडी ठेवा! मी येतोय…” या रितेश देशमुख यांच्या दमदार डायलॉगने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला आहे. यंदा पुन्हा एकदा ‘भाऊ’च्या भूमिकेत रितेश देशमुख प्रेक्षकांच्या भेटीला येत असून, त्यांचा तोच स्वॅग पण खास पॅटर्नमध्ये पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
मागील सिझनला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर बिग बॉस मराठी सिझन 6 आणखी भव्य स्वरूपात सादर केला जाणार आहे. नव्या प्रोमोमध्ये रितेश भाऊंचा आत्मविश्वास, देसी अॅटिट्यूड आणि ठसकेबाज संवाद प्रेक्षकांना खिळवून ठेवतात. “मागचा सिझन वाजवलाय, यंदाचा गाजवायचाय… आहात ना तय्यार!” या एका वाक्यानेच चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह निर्माण झाला आहे. (Bigg Boss Marathi Season 6)
कधी सुरू होणार बिग बॉस मराठी सिझन 6? :
बिग बॉस मराठी सिझन 6ची अधिकृत सुरुवात 11 जानेवारी 2026 पासून होणार आहे. हा बहुचर्चित रिअॅलिटी शो प्रेक्षकांना दररोज नव्या ट्विस्ट्स, ड्रामा आणि मनोरंजनाचा फुल डोस देणार आहे. हा शो दररोज रात्री 8 वाजता कलर्स मराठी या वाहिनीवर प्रसारित केला जाणार असून, टीव्हीबरोबरच डिजिटल प्रेक्षकांसाठीही खास सोय करण्यात आली आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवर बिग बॉस मराठी सिझन 6 JioHotstarवर पाहता येणार आहे. त्यामुळे कुठेही आणि कधीही हा शो पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. टीव्ही आणि ओटीटी या दोन्ही माध्यमांवर एकाचवेळी शो पाहता येणार असल्याने, यंदाचा सिझन प्रेक्षकसंख्येचे नवे विक्रम प्रस्थापित करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
Bigg Boss Marathi Season 6 | यंदाचा सिझन का ठरणार खास? :
यंदाचा बिग बॉस मराठी सिझन 6 अनेक अर्थाने खास ठरणार आहे. नव्या प्रोमोमध्ये उभारलेला आलिशान सेट, ढोल-ताशांचा दणदणीत गजर, भव्य मिरवणुकीसारखं वातावरण, रंगीबेरंगी रोषणाई आणि तब्बल 250 ते 300 लोकांच्या उपस्थितीत चित्रीत करण्यात आलेला प्रोमो यंदाच्या भव्यतेची झलक दाखवतो. विशेष म्हणजे रितेश देशमुख पहिल्यांदाच प्रोमोमध्ये पारंपरिक वेशभूषेत दिसत आहेत, ज्यामुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे. (Bigg Boss Marathi Season 6)
प्रत्येक फ्रेममध्ये भाऊंचा आत्मविश्वास आणि स्टाईल स्पष्टपणे जाणवते. यंदाचा पॅटर्न नेमका काय असणार, घरात कोणते चेहरे पाहायला मिळणार, कोण घर गाजवणार आणि कोणाला प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागणार, याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.






