बिग बॉस फेम अभिनेत्रीला जीवे मारण्याची धमकी! केली 10 कोटींची मागणी

On: February 15, 2026 2:08 PM
Himanshi Khurana
---Advertisement---

Himanshi Khurana | बॉलिवूड आणि पंजाबी मनोरंजनविश्वातील कलाकारांना मिळणाऱ्या धमक्यांची मालिका थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13) मधून प्रसिद्धी मिळवलेल्या अभिनेत्री हिमांशी खुराना (Himanshi Khurana) हिला तब्बल 10 कोटी रुपयांची खंडणी मागत जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणामुळे तिच्या कुटुंबातही भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

ई-मेल आणि ऑडिओद्वारे धमकी :

यापूर्वी दिग्दर्शक रोहित शेट्टी (Rohit Shetty) यांच्या इमारतीबाहेर गोळीबाराची घटना घडली होती, तर अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याला ऑडिओ मेसेजद्वारे धमकी मिळाली होती. सलमान खान (Salman Khan) यांचा मेहुणा आयुष शर्मा (Aayush Sharma) याच्यानंतर आता हिमांशी खुरानालाही लक्ष्य करण्यात आले आहे. तिला तिच्या वैयक्तिक ई-मेल आयडीवर एक संदेश पाठवण्यात आला असून त्यामध्ये छोटा मजकूर आणि ऑडिओ क्लिप जोडलेली होती.

त्या ऑडिओमध्ये परदेशातून बोलत असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीचा आवाज ऐकू येतो. “झीशान अख्तर टीम टोन बोलदे, तौडे लाय इक इम्पॉर्टंट मेसेज साडा,” असे म्हणत संबंधित व्यक्तीने 10 कोटी रुपयांची मागणी केली आहे. या घटनेनंतर हिमांशीने तातडीने मोहाली पोलीस ठाणे (Mohali Police Station) येथे तक्रार नोंदवली. तसेच सोहाना पोलीस ठाणे (Sohana Police Station) येथे या ई-मेल प्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलीस अधीक्षक सौरव जिंदाल (Saurav Jindal) यांनी हा संदेश परदेशात असलेल्या गुंडाकडून पाठवण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली असून त्याचा माग काढण्यासाठी तपास सुरू असल्याचे सांगितले.

Himanshi Khurana | गुन्हेगारी टोळ्यांचा संदर्भ :

या प्रकरणामुळे अभिनेत्री आणि तिच्या कुटुंबीयांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. त्यांनी पोलिसांकडे त्वरित कारवाईची मागणी केली असून ई-मेल व व्हॉइस नोट्सच्या तांत्रिक तपासावर भर दिला जात आहे. धमकीत झीशान अख्तर (Zeeshan Akhtar) याचा उल्लेख करण्यात आल्याने पोलिसांनी त्याबाबतही चौकशी सुरू केली आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी (Baba Siddique) यांच्या हत्येप्रकरणात तो वाँटेड असल्याची नोंद आहे.

झीशान अख्तरचे नाव लॉरेन्स बिष्णोई (Lawrence Bishnoi), गोल्डी ब्रार (Goldy Brar) आणि रोहित गोदारा (Rohit Godara) यांच्याशी संबंधित प्रतिस्पर्धी टोळ्यांशी जोडले गेले आहे. त्यामुळे या धमकीमागे कोणत्या गुन्हेगारी जाळ्याचा संबंध आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.

दरम्यान, पंजाबमधील किरतपूर साहिब (Kiratpur Sahib) येथील 34 वर्षीय हिमांशी खुरानाने वयाच्या 16 व्या वर्षी मॉडेलिंगला सुरुवात केली होती. 2011 मध्ये तिने मिस लुधियाना (Miss Ludhiana) हा किताब जिंकला आणि नंतर बिग बॉसच्या तेराव्या सिझनमध्ये सहभागी झाली. सोशल मीडियावर तिचे 1.2 कोटींहून अधिक फॉलोअर्स आहेत.

News title : Bigg Boss Fame Actress Gets Threat

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now