Bigg Boss 19 Finale | बिग बॉस 19 च्या चाहत्यांसाठी मोठी अपडेट समोर आली आहे. या सीझनचे अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. कारण 7 डिसेंबर 2025 रोजी या सीझनचा विजेता घोषित होणार आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. बिग बॉसनं सदस्यांना असेंबली रूममध्ये बोलावून “तुमच्या मते विजेता कोण?” असा प्रश्न विचारला. यानंतर घरातील वातावरण आणखी रंगतदार झाले. (Bigg Boss 19 Finale)
फरहाना भट्ट हिने तान्या मित्तलचे नाव घेतले. तान्याने गौरव खन्नाचा उल्लेख केला. गौरवने प्रणित मोरेची निवड केली. अमाल मलिकनेही प्रणित मोरेचेच नाव घेतले. तर प्रणित मोरेने गौरव खन्नावर विश्वास दाखवला. तान्या, फरहाना आणि गौरव खन्ना यांना प्रत्येकी एक मत मिळाले.
मालती चहर घराबाहेर; फिनालेपूर्वी मोठा निर्णय :
अमाल मलिक, प्रणित मोरे, फरहाना भट्ट, तान्या मित्तल आणि मालती चहर या पाच जणांना बिग बॉसने नामांकनात ठेवले होते. मतदान प्रक्रिया सुरू होताच घरात तणावाचे वातावरण पसरले. मालती चहरची वेळ येताच तिने स्वतःचा फोटो बॉक्समध्ये ठेवला आणि लगेचच लाल लाईट लागला. यावरून मालती चहरला घराबाहेरचा मार्ग दाखवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय क्रिकेटर दीपक चहरची बहीण मालतीने या सीजनमध्ये दमदार खेळी आणि हंगामा केला होता. पण फिनालेच्या काही दिवस आधीच तिच्या एव्हिक्शनमुळे प्रेक्षकांना मोठा धक्का बसला.
Bigg Boss 19 चे टॉप 5 फायनलिस्ट जाहीर :
मालती चहर बाहेर गेल्यानंतर Bigg Boss 19 चे टॉप 5 फायनलिस्ट निश्चित झाले आहेत. अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या स्पर्धकांची यादी अशी :
तान्या मित्तल
फरहाना भट्ट
गौरव खन्ना
अमाल मलिक
प्रणित मोरे (Pranit More)
या पाच स्पर्धकांपैकीच एका स्पर्धकाच्या गळ्यात Bigg Boss 19 च्या विजेतेपदाची माळ पडणार आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता ताणतणावाला पोहोचली आहे.
Bigg Boss मध्ये प्रत्येक क्षणी गेम उलटा होऊ शकतो. त्यामुळे विजेता कोण ठरेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे.






