काँग्रेसला मोठा धक्का! बडा नेता भाजपात सामील

On: January 7, 2026 4:39 PM
Municipal Elections 2026
---Advertisement---

Municipal Elections 2026 | राज्यात सध्या महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला मतमोजणी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांमध्ये हालचालींना वेग आला आहे. तिकीट वाटपावरून अनेक ठिकाणी नाराजी दिसून येत असून, काही ठिकाणी पक्षांतर्गत तणावही वाढलेला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर पक्षांतराचे प्रमाण वाढले असून सध्या भाजपमध्ये सर्वाधिक ‘इनकमिंग’ होत असल्याचे चित्र आहे. अशातच आता काँग्रेसला मोठा धक्का बसला असून ऐन महापालिका निवडणुकीआधी भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती समोर आली आहे. (Congress BJP News)

काँग्रेसच्या शहराध्यक्षांचा भाजपमध्ये प्रवेश, 12 नगरसेवक सोबत :

अंबरनाथ शहर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पाटील हे आपल्या 12 नगरसेवकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा पक्षप्रवेश काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जात असून, स्थानिक राजकारणात यामुळे मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. महापालिका निवडणुकीच्या अगदी आधी हा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसच्या संघटनात्मक ताकदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

या पक्षप्रवेशाबाबत बोलताना प्रदीप पाटील (Pradip Patil) यांनी काँग्रेस नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसने निवडणुकीच्या प्रक्रियेत आम्हाला कधीही विश्वासात घेतले नाही, आम्ही आमच्या ताकदीवर निवडून आलो, असा आरोप त्यांनी केला आहे.

Municipal Elections 2026 | काँग्रेस प्रदेशाध्यक्षांवर गंभीर आरोप, भाजप नेतृत्वावर विश्वास :

प्रदीप पाटील यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांच्यावर गंभीर आरोप करत खळबळ उडवून दिली आहे. ब्लॉक अध्यक्ष पदासाठी आपल्याकडे एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसेच युतीच्या निर्णयांबाबतही वरिष्ठ नेतृत्वाकडून दुर्लक्ष करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadanvis) आणि रवींद्र चव्हाण (Ravindra chavan) यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आपण भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे प्रदीप पाटील यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, भाजपमध्ये मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू असले तरी तिकीट न मिळालेल्या इच्छूकांमध्ये नाराजी वाढत असल्याचेही चित्र सध्या दिसून येत आहे.

News Title: Big Setback for Congress Ahead of Municipal Elections 2026, Major Leaders to Join BJP

Sonal.K

Sonal Kothimbire

Join WhatsApp Group

Join Now