Chhagan Bhujbal | मंत्री छगन भुजबळांचा विधानसभेत मोठा गौप्यस्फोट!

On: December 13, 2023 7:26 PM
Chhagan Bhujbal
---Advertisement---

नागपूर | राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मोठा गौप्यस्फोट केला आहे. मला गोळी मारली जाईल, असा धक्कादायक दावा भुजबळांनी विधानसभेत केला आहे.

छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी आज मराठा आरक्षणप्रश्नी राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीवर सभागृहात भाष्य केलं. यावेळी त्यांनी मनोज जरांगेंवरही टीका केली. तसेच काही गंभीर आरोप देखील केले.

Chhagan Bhujbal यांचा मोठा गौप्यस्फोट

अचानक माझ्या घरी सुरक्षा वाढवली आहे. मी पोलिसांना विचारलं काय गडबड आहे? पोलीस म्हणाले, साहेब वरून इनपूट आलंय. भुजबळांना गोळी मारली जाईल… रिपोर्ट आहे, असा गौप्यस्फोट छगन भुजबळ यांनी सभागृहात केला आहे.

“मी मरायलाही तयार”

मी मरायलाही तयार आहे. मराठ्यांना आरक्षण द्या आणि ही झुंडशाही थांबवा, एवढंच माझं म्हणणं आहे. आज भुजबळ असतील. उद्या दुसरं कोणी असेल. आपण गप्प बसणार आहात का? कोणी बोलणार नाही? धिक्कार करणार नाही? निषेध करणार नाही. आपण फक्त पाहणार का?, असा सवाल भुजबळांनी केलाय.

24 डिसेंबला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी, भुजबळ फॉर्म… ज्यांना कोणाला पाहायचं आहे, त्यांनी नावे कळवावी, हे पत्रकही भुजबळांनी वाचून दाखवलं. माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झाली. प्रकाश सोळंके, संदीप क्षीरसागरचं झालं, आता माझ्यावरही हल्ला होणार, असं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण हवं असल्याने छगन भुजबळांनी नकार दिलाय. मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नसून ओबीसीतून त्यांना आरक्षण देण्यास विरोध केला आहे. यावरून दोघांमध्ये वाकयुद्ध सुरूच आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

Parliament | आताची सर्वात मोठी बातमी! लोकसभेत घडला धक्कादायक प्रकार

Ravindra Berde | मरणापूर्वी ‘या’ गंभीर आजाराने त्रस्त होते रवींद्र बेर्डे

कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद?; Amitabh Bachchan यांनी उचललं मोठं पाऊल

CAR | भारीच की! Tata पासून Maruti पर्यंत ‘या’ गाड्यांवर दीड लाखाचा डिस्काऊंट

Rinku Singhच्या बॅटमधून निघाला आग ओकणारा बॉल, Video पहाल तर थक्क व्हाल!

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now