मोठी बातमी! मराठा आंदोलक भडकले; ‘या’ आमदाराच्या घरावर दगडफेक

On: October 30, 2023 1:38 PM
---Advertisement---

बीड | मराठा आंदोलक आक्रमक झाल्याचं दिसतंय. नेत्यांना गावबंदी नंतर आता नेत्यांच्या घरावर दगडफेत करण्यात आल्याची माहिती समोर आलीये. अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर आक्रमक मराठा आंदोलकांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर आली आहे

मराठा आरक्षणावरुन राज्यात चांगलं वातावरण तापलं आहे. राजकारणातील अनेक नेते मंडळींच्या गाड्या जाळण्यात येत आहेत. अशातच आता बीडच्या माजलागाव येथील राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंंके यांच्या घरावर दगडफेक करण्यात आली आहे. शिवाय त्यांची गाडीची जाळपोळ करण्यात आली आहे.

आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी माजलगाव आणि वडवणी तालुका बंदची हाक देण्यात आली आहे. असं असताना सर्व आस्थापना बंद ठेवण्याचं आवाहन सकल मराठा समाजाकडून करण्यात आलं होतं.

प्रकाश सोळंखे यांना आपली मराठा आरक्षणाबाबत भूमिका मांडायला सांगितली होती. दरम्यान अचानक त्यांच्या घराबाहेर दगडफेक सुरु झाली. सुदैवाने आमदार सोळंके आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्य सुखरुप असल्याची माहिती आहे.

थोडक्यात बातम्या-

Mrudula Jog

Mrudula Jog

Join WhatsApp Group

Join Now