पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर; अजित पवारांना धक्का

On: June 30, 2024 12:55 PM
Maharashtra Vidhansabha 2024
---Advertisement---

Ajit Pawar | पिंपरी चिंचवडमधून मोठी बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. पिंपरी चिंचवडचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 नगरसेवकांनी शनिवारी मोदीबागेत शरद पवार यांची भेट घेतली. हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

अजित पवारांना धक्का

पुन्हा एकदा विलास लांडेंच्या उपस्थितीमध्ये हे सर्व जण शरद पवार यांना भेटणार आहेत. पाच जुलै रोजी त्यांचा राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. लवकरच या सर्वांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. हा अजित पवारांना (Ajit Pawar) होम ग्राऊंडवर मोठा धक्का मानला जात आहे. नगरसेवकांच्या भेटीवर शरद पवारांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

हल्ली मला रोज दोन तीन तास काढावे लागतात नवीन लोकं पक्षात येणारे आहेत, त्यांना भेटायला. नगरसेवकांनी आमची भेट घेतली. जे येणार आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. नव्या पिढीतल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहित करण्याचा आमचा प्रयत्न राहील, असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Ajit Pawar | अनेक नेते घरवापसी करणार?

महायुतीला मोठा धक्का बसला असून महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे. स्ट्राईक रेटबद्दल बोलायचं झालं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचा सर्वाधिक आहे. याचा परिणामही आता दिसू लागला आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार यांच्या पक्षातील अनेक आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटातील नेते करीत आहेत. अनेक नेत्यांची आता घरवापसी होत आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अजित पवार यांच्या पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष ए. वाय पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतली. पाटील यांना शरद पवार यांच्यासोबत पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार अजित पवार यांना मोठा धक्का देणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

‘मी आरडाओरडा केला आणि काढ ती बंदूक म्हणाले…’; रुपाली ठोंबरेंसोबत घडला भयानक प्रकार

टीम इंडियाची स्वप्नपूर्ती! T20 वर्ल्ड कपवर कोरलं नाव

प्रेमीयुगुलांसाठी पावसाळ्यात ‘ही’ ठिकाणे आहेत पर्यटनाची बेस्ट ऑप्शन्स!

राज्यातील ‘या’ भागांना हवामान खात्याचा अत्यंत महत्वाचा इशारा!

“राज्य सरकारलाच तीर्थक्षेत्रावर जायची वेळ..”; नाना पटोले यांचा खोचक टोला

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now