EPFO | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (ईपीएफओ) करोडो ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. EPFO ने आता कोरोनाच्या काळात सुरू झालेली कोविड ॲडव्हान्स सुविधा बंद केली आहे.
कोरोना महामारीच्या काळात खातेदारांना त्यांच्या पीएफ खात्यातून आगाऊ स्वरूपात पैसे काढण्याची सुविधा देण्यात आली होती. आता ही सुविधा कोविड-19 महामारीमुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी नसल्यामुळे बंद करण्यात आली आहे.
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी
12 जून 2024 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये, EPFO ने म्हटलं आहे की, COVID-19 यापुढे साथीचा रोग नसल्यामुळे, सक्षम प्राधिकरणाने ही आगाऊ सेवा त्वरित प्रभावाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय सूट मिळालेल्या ट्रस्टनाही लागू होईल.
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) खातेदार कोविड-19 मुळे उद्भवलेल्या आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी दोनदा पैसे काढू शकतात. EPFO ने कोविड-19 महामारीच्या पहिल्या लाटेदरम्यान EPF सदस्यांना परत न करण्यायोग्य आगाऊ रक्कम काढण्याची सुविधा दिली होती. नंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या आगमनाने, 31 मे 2021 पासून आणखी एक आगाऊ पैसे काढण्याची परवानगी देण्यात आली.
EPFO | दोन कोटींहून अधिक सदस्यांनी काढले पैसे
EPFO च्या दोन कोटींहून अधिक सदस्यांनी कोरोना आगाऊ पैसे काढण्याच्या सुविधेचा लाभ घेतला होता. 2023 पर्यंत कोरोना आगाऊ म्हणून 48,075.75 कोटी रुपये काढण्यात आले. EPFO च्या मसुदा वार्षिक अहवाल 2022-23 नुसार, EPFO ने 2020-21 मध्ये 69.2 लाख ग्राहकांना 17,106.17 कोटी रुपये वितरित केले.
2021-22 मध्ये, 91.6 लाख ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घेतला आणि 19,126.29 लाख कोटी रुपये आगाऊ काढण्यात आले. त्याचप्रमाणे, 2022-23 मध्ये, 62 लाख ग्राहकांनी त्यांच्या पीएफ खात्यातून 11,843.23 कोटी रुपये काढले.
महत्त्वाच्या बातम्या-
रिमझिम पावसात लोणावळ्याला जायचा प्लॅन करताय?, मग ‘या’ 17 ठिकाणांना नक्की भेट द्या
पंतप्रधानांना किस करतानाचा मेलोनी यांचा व्हिडीओ व्हायरल!
सुप्रिया सुळे मुख्यमंत्री होणार?, रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
‘अहंकारी झाले त्यांना प्रभू श्रीरामाने…’; आरएसएसची भाजपवर बोचरी टीका






