रेशनधारकांबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय

On: December 24, 2022 12:32 PM
Ration Card
---Advertisement---

नवी दिल्ली | सध्या देशात मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. नुकताच केंद्र सरकारनं(Central Goverment) रेशनधारकांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळं रेशनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोरोनाचं संकट आल्यावर सरकारनं 2020 मध्ये ‘प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना'(Pradhan Mantri Garib Kalyan Yojana) सुरू केली होती. या योजनेद्वारे बीपीएल कार्ड असलेल्या नागरिकांना दर महिन्याला 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत दिले जात आहे.

सुरूवातीला ही योजना फक्त 3 महिन्यांसाठी लागू केली होती. परंतु नंतर सातत्यानं या योजनेचा कालवधी वाढवण्यात आला आहे. म्हणूनच या योजनेचा आजही नागरिकांना लाभ मिळत आहे.

सरकारनं गेल्या तीन महिन्यांपूर्वी घेतलेल्या निर्णयानुसार या योजनेचा कालावधी डिसेंबर महिन्यापर्यंत आहे. परंतु सरकारनं आता पुन्हा मोठा निर्णय घेत रेशनधारकांना दिलासा दिला आहे.

या योजनेची मुदत आता एक वर्षांसाठी वाढवण्यात आली आहे. या योजनेची मुदत पुढच्या डिसेंबरपर्यंत वाढवल्यानं सरकारच्या तिजोरीला 2 लाख कोटी रूपयांचा अतिरिक्त बोजा सहन करावा लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

Join WhatsApp Group

Join Now