अंबानी-अदानींना मोठा दणका; दर सेकंदाला ‘इतक्या’ लाखांचं नुकसान

On: December 24, 2022 12:33 PM
---Advertisement---

मुंबई | कोरोनामुळे जगभरातील शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. शुक्रवारी परदेशी बाजारात फारशी घसरण झाली नसली तरी भारतीय शेअर बाजारात मात्र 1.50 टक्क्यांहून अधिक घसरण झाली.

ज्याचा परिणाम भारतीय अब्जाधीशांच्या नेटवर्थवर दिसून आला. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या आकडेवारीनुसार, भारतातील 19 अब्जाधीशांपैकी 18 अब्जाधीशांच्या संपत्तीत सुमारे 16 बिलियनची घट झाली आहे.

विशेष म्हणजे एकूण घसरणीपैकी निम्म्याहून अधिक घसरण गौतम अदानींच्या नेट वर्थमध्ये झाली आहे. गेल्या 24 तासांत त्यांना प्रत्येक सेकंदाला 90 लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

फक्त लक्ष्मी मित्तल यांच्या संपत्तीत वाढ झाली आहे. ज्यांच्या एकूण संपत्तीत $162 दशलक्ष म्हणजेच 1338 कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

दरम्यान, मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीमध्ये $2.71 अब्ज म्हणजेच 2,23,85,77,88,500 रुपयांचं नुकसान झालं. ते जगातील 9व्या क्रमांकाचे श्रीमंत उद्योगपती आहेत आणि या वर्षी त्यांच्या संपत्तीत $4.55 बिलियनचे नुकसान झालं आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती 85.4 अब्ज डॉलर आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Babita Durande

Babita Durande

Join WhatsApp Group

Join Now