शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज! भेंडवळची भविष्यवाणी जाहीर; यंदा पाऊस चांगला पडणार

On: May 11, 2024 1:27 PM
Bhendwal Bhavishyavani 2024
---Advertisement---

Bhendwal Bhavishyavani | पूर्णा नदीच्या काठी वसलेल्या भेंडवळ या गावात घट मांडणीची परंपरा सुमारे 300 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बुलढाणा जिल्ह्यात भेंडवळ येथे करण्यात आलेल्या घट मांडणीत पावसाबद्दल भाकीत करण्यात आलंय.

संपूर्ण राज्यासह विदर्भातील शेतकऱ्यांचे आणि राजकीय प्रतिनिधींचे लक्ष लागून असलेली प्रसिद्ध भेंडवळ घट मांडणी 10 मे रोजी संध्याकाळी करण्यात आली होती. याची भविष्यवाणी आता समोर आली आहे. यात शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार असल्याचं भाकीत समोर आलंय.

या भाकितात पुढील वर्षी वातावरण कसे राहील, पीक पाणी कसे राहील, पाऊस कसा राहील या बद्दल भाकीत वर्तवण्यात आले. यंदा अवकाळी पाऊस सर्वाधिक होईल. या सोबतच पावसाळ्याच्या सुरवातीच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील त्यानंतरच्या दोन महिन्यात पावसाचे प्रमाण वाढेल असे भाकीत भेंडवळमध्ये वर्तवण्यात आले.

यंदा पाऊस चांगला पडणार

या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर हे भाकीत केलं जातं. या भाकीताच्या आधारे विदर्भातील शेतकरी पिकांचे नियोजन देखील करत असतात. हे भाकीत ऐकण्यासाठी दूरवरून शेतकरी येत असतात.

या वर्षी जून, जुलै हे महिन्यात कमी पाऊस पडणार आहे.त्यानंतर ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. गेल्या वर्षी या घटमांडणीतून जे भाकित (Bhendwal Bhavishyavani ) करण्यात आले होते ते 90 टक्के खरे झाले.घटमांडणीतील भाकितानुसार यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. खरिप हंगामात पिकं साधारण राहणार असून रब्बी हंगामात गव्हाचे पिक चांगले येणार आहे. यामुळे शेतकरी सुखावले आहेत.

भेंडवळची घट मांडणी कशी केली जाते?

प्रसिद्ध घट मांडणीत गावाच्या पूर्वेच्या दिशेला एका शेतात अठरा प्रकारची धान्ये एका गोलाकार आकारात ठराविक अंतरावर ठेवली जातात. तसेच मध्यभागी खड्डा तयार करून त्यात चार मातीचे गोळे ठेऊन त्यावर एक पाण्याची घागर ठेवली जाते. तसेच त्यावर पुरी, करंजी, पान सुपारी ठेवण्यात येते.

यामध्ये प्रत्येक वस्तु एका प्रतिकाप्रमाणे वापरली जाते.अक्षय्य तृतीयेची रात्र या घटमांडणीवरून गेल्या नंतर या घटात झालेल्या बदलांच्या आधारे देशातील पीक-पाणी राजकीय परिस्थिती, आर्थिक परिस्थिती तसेच विविध अंदाज वर्तविले जातात. या वर्षी (Bhendwal Bhavishyavani )पावसाची परिस्थिती सर्वसाधारण राहील असे भाकीत वर्तवण्यात आले आहे.

News Title – Bhendwal Bhavishyavani 2024

महत्त्वाच्या बातम्या-

“राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे बाळासाहेब ठाकरेंच्या आत्म्याला त्रास होत असेल”

नागरिकांनो ‘या’ तीन आरोग्य विमा पॉलिसी झाल्या बंद; पॉलिसीधारकांचे काय होणार?

नवीन आलिशान कार लाँच, किंमत एकूण खरेदी करण्याचा येईल मनात विचार

रोहित पवारांचा बारामतीत पैसे वाट्ल्याचा आरोप खरा ठरणार? बँक व्यवस्थापकाचं निलंबन

अब्दु रोजिकने उरकला साखरपुडा; ‘या’ दिवशी अडकणार लग्नबंधनात

Join WhatsApp Group

Join Now