छमछम बारवाले, कृतघ्न, श्वान… भास्कर जाधवांची रामदास कदमांवर जहरी टीका

On: October 4, 2025 10:39 AM
Bhaskar Jadhav On Ramdas Kadam
---Advertisement---

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | दोन्ही शिवसेनेच्या (Shivsena) दसरा मेळाव्यानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण झाला आहे. शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या निधनासंदर्भात खळबळजनक दावा केल्याने ठाकरे गट संतापला आहे. “बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवण्यात आला” , असा सवाल रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उपस्थित केला. या विधानानंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगली असून ठाकरे गटाचे नेते भास्कर जाधव यांनी यावर सडकून टीका केली आहे. (Bhaskar Jadhav On Ramdas Kadam)

भास्कर जाधवांनी घेतला कदमांचा समाचार :

भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आपल्या भाषणात रामदास कदम यांची चांगलीच खरडपट्टी काढली. “रामदास कदम हे एकीकडे स्वतःला बाळासाहेबांचे भक्त म्हणवून घेतात आणि दुसरीकडे त्यांच्याच विरोधात अश्लाघ्य टीका करतात. हे पूर्णपणे अयोग्य आहे. कदम हे प्रत्यक्षात बामदास कदम आहेत. ते छमछम बारवाले आहेत. महिलांकडून पैसे कमावायचे आणि स्वतः ते उडवायचे, असे त्यांच्या बाबतीत घडत आले आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून असेच शब्द बाहेर पडतात,” अशी जहरी टीका भास्कर जाधव यांनी केली.

जाधव यांनी यावेळी कदमांच्या राजकीय प्रवासावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “शिवसेनेने 32 वर्षे त्यांना लोकप्रतिनिधी केले, परंतु त्यांच्याकडून कधीच कृतज्ञता व्यक्त होत नाही. कारण ते कृतघ्न आहेत. ज्या शिंदे सेनेचे ते आज नेते आहेत, त्या पक्षाला तीन वर्षे पूर्ण झाली तरी एकदाही त्यांना प्रमुख भाषणासाठी बोलावलं नाही. पक्षात त्यांना किंमत नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

Bhaskar Jadhav On Ramdas Kadam | थेट श्वानाशी केली तुलना :

यावरून पुढे बोलताना जाधवांनी कदमांची थेट श्वानाशी तुलना केली. “रामदास कदम यांच्याकडून चांगले विचार किंवा प्रबोधन अपेक्षित नाही. त्यांच्यासारख्या लोकांना किंमत नसते. अशा लोकांना केवळ मेळाव्यांमध्ये भुंकल्यावरच किंमत दिली जाते. म्हणून रामदास कदम हे श्वानासारखे आहेत,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.

या तिखट शब्दांमुळे ठाकरे गट आणि शिंदे गटातील जुना संघर्ष पुन्हा पेटला आहे. रामदास कदम यांच्या विधानामुळे राजकीय वातावरण तापले असून भास्कर जाधवांनी केलेल्या प्रतिउत्तरामुळे आता रामदास कदम त्यांना काय उत्तर देणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणामुळे शिवसेनेच्या दोन्ही गटांतील आरोप–प्रत्यारोपांची मालिका अजून तीव्र होणार, हे स्पष्ट झाले आहे.

News Title :- Bhaskar Jadhav’s scathing attack on Ramdas Kadam

Join WhatsApp Group

Join Now