Benefits of Beetroot Juice | निरोगी आरोग्यामागे आपल्या आहाराचा सर्वात मोठा वाटा असतो. आपण कोणता आहार घेतो, आपण किती व्यायाम करतो यावर शरीराचे संतुलन आणि निरोगी आरोग्य अवलंबून असते.
आपल्या आहारात सर्व प्रकारचे अन्न पदार्थ असायला हवेत. विविध भाज्या, फळे तसेच इतर पोषक घटक आपल्या आहारात पाहिजेत. संतुलित आहार घेतला तर त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येतात. आपल्या शरीराला पोषक तत्त्व मिळायला हवीत. यासाठी आपल्या आहारात सर्व प्रकारची फळे, पालेभाज्या, दुग्धजन्य पदार्थ असायला हवी. त्यातच बीट हे (Benefits of Beetroot Juice) आपल्या जेवणात पाहिजेच.
बीट तुम्ही सॅलड म्हणूनही खाऊ शकता. तसेच बीटचा रस तर खूपच फायद्याचा ठरतो. बीटमध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात. बीट तुम्हाला तंदुरुस्त आणि निरोगी बनविण्यास मदत करते. यामध्ये भरपूर प्रमाणात लोह असते.
बीटचे सेवन केल्याने शरीरातील हिमोग्लोबिन योग्य राहते आणि त्वचा चमकदार व सुंदर राहते. बीटमध्ये कॅलरीज कमी असतात आणि जीवनसत्त्वे व खनिजे यांसारखे पोषक घटक भरपूर असतात. त्यामुळे बीट खायलाच हवं.
बीट खाण्याचे फायदे
जीवनसत्त्व अ व क, फायबर, सोडियम, पोटॅशियम, फॉस्फरस, क्लोरिन, आयोडीन, लोह व नैसर्गिक साखर या घटकांनी समृद्ध बीट आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरते.
बीट फोलेटचा उत्कृष्ट स्रोत आहे; जो रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी प्रभावी आहे. त्यामुळे बीट रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. यामुळे बीट (Benefits of Beetroot Juice) नियमित खायला हवे.
बीटमध्ये कमी कॅलरीज असतात, तसेच शून्य फॅट असते. त्यामुळे तुम्ही जर वजन कमी करण्याचा विचार करत असाल तर बीटचा आहारात समावेश करायला हवा. बीटमुळे चरबी कमी होण्यास मदत होते.
बीटरूटमध्ये (Benefits of Beetroot Juice) आढळणारे फायबर पचनासाठी खूप फायदेशीर आहे. बीटरूट पचन क्षमता सुधारीत करते. यामुळे बद्धकोष्ठता टाळून निरोगी पाचन तंत्रास प्रोत्साहन मिळते.
News Title- Benefits of Beetroot Juice
महत्त्वाच्या बातम्या –
आरक्षणासंबंधी छगन भुजबळांच्या आरोपांवर सुप्रिया सुळेंचं जशास तसं प्रत्युत्तर; म्हणाल्या..
“तुम्ही फक्त अर्ज करा, तो मंजूर करणं..”; लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं मोठं वक्तव्य
छगन भुजबळांचा शरद पवारांवर अत्यंत गंभीर आरोप; महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ
अनंत-राधिकाच्या लग्नात हार्दिक पांड्या 2 टकिला मागतानाचा VIDEO व्हायरल!
धक्कादायक! अमरावतीत सिटी बसने चौघांना चिरडले, 9 वर्षीय चिमूकल्याचा चाकाखाली आल्याने जागीच मृत्यू






