BCCI चा वार्षिक करार! किशन-अय्यरला वगळलं; विराट-रोहितसह दोघांना मिळणार 7 कोटी

On: February 29, 2024 5:33 AM
BCCI Central Contract
---Advertisement---

BCCI Central Contract | बीसीसीआयने खेळाडूंचा नवा वार्षिक करार जारी केला आहे. बीसीसीआयच्या नवीन करारामध्ये एकूण 40 खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन आणि मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर यांना या करारात स्थान मिळालेले नाही. इशान किशन आणि श्रेयस अय्यर यांच्यावर रणजी ट्रॉफीमध्ये भाग न घेतल्याने बीसीसीआयने कारवाई केल्याचे बोलले जात आहे. याआधी मागील करारात अय्यर बी ग्रेडमध्ये होता आणि इशान सी ग्रेडमध्ये होता.

मराठमोळ्या अजिंक्य रहाणेशिवाय शिखर धवन, उमेश यादव आणि युझवेंद्र चहल या बड्या खेळाडूंचा बीसीसीआयच्या नव्या करारात समावेश करण्यात आलेला नाही. रोहित शर्माशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना बीसीसीआयच्या करारामध्ये ए प्लस ग्रेडमध्ये ठेवण्यात आले आहे. तर आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या यांना ए ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे.

किशन-अय्यरला डच्चू

सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल यांना बी ग्रेड मध्ये स्थान मिळाले आहे. मात्र, याआधी भारतीय यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत हा ग्रेड ए मध्ये होता, पण आता या खेळाडूचा बी ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.

खरं तर अपघातानंतर पंत क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. हा यष्टिरक्षक फलंदाज बऱ्याच दिवसांपासून मैदानावर दिसला नाही. त्यामुळे आता बीसीसीआयच्या वार्षिक करारात त्याचे नुकसान झाल्याचे दिसते. रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार यांना सी ग्रेडमध्ये स्थान मिळाले आहे.

BCCI Central Contract जाहीर

दरम्यान, ए प्लस ग्रेडमधील खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतात. अशाप्रकारे रोहित शर्माशिवाय विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा यांना वर्षाला 7 कोटी रुपये मिळतील. तर A श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 5 कोटी रुपये मिळतील. तर बी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक 3 कोटी रुपये मिळतात. याशिवाय क श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक एक कोटी रुपये मिळतील.

ए प्लस ग्रेड – रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह आणि रवींद्र जडेजा
ए ग्रेड – आर अश्विन, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, लोकेश राहुल, शुभमन गिल आणि हार्दिक पांड्या
बी ग्रेड – सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, कुलदीप यादव, अक्षर पटेल आणि यशस्वी जैस्वाल.
सी ग्रेड – रिंकू सिंग, तिलक वर्मा, ऋतुराज गायकवाड, शार्दुल ठाकूर, शिवम दुबे, रवी बिश्नोई, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, मुकेश कुमार, संजू सॅमसन, अर्शदीप सिंग, केएस भरत, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि रजत पाटीदार.

News Title- BCCI Central Contract has been announced and Ishan Kishan and Shreyas Iyer have been dropped
महत्त्वाच्या बातम्या –

“आता लोकांनीही जरांगेंना डोक्यावरून उतरवलं, त्यांना माफी नाहीच”

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी, 1 मार्चपासून होणार मोठा बदल

‘इतक्या’ लाख कुटुंबांना घर देणार, सरकारची मोठी घोषणा

शिरूर मतदारसंघातून कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?

रणवीर सिंहचा साधेपणा; आलिबागमधील खेडे गावातील तरूणांसोबत घालवला वेळ

Join WhatsApp Group

Join Now