Adah Sharma | अदा शर्माच्या चाहत्यांसाठी मोठी गुड न्यूज!

On: January 16, 2024 4:40 PM
---Advertisement---

Bastar | ‘द केरल स्टोरी’ या सुपरहीट चित्रपटानंतर अभिनेत्री अदा शर्मा (adah sharma) लवकरच एका नव्या चित्रपटात दिसणार आहे. ‘द केरल स्टोरी’ च्या निर्मात्यांचाच हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्ट (Bastar: The Naxal Story) करण्यात आला आहे. यामध्ये अदा हातात बंदूक घेताना दिसून येत आहे.

‘द केरल स्टोरी’ हा चित्रपट बऱ्याच वादात अडकला होता. काही जणांनी याला एका विशेष धर्माला टार्गेट करण्यासाठी याची निर्मिती केल्याचे म्हटले होते. यात राजकीय पक्षांनीही आपली भूमिका घेतली होती. या वादग्रस्त चित्रपटानंतर याच्या निर्मात्यांनी अदा शर्माला घेऊन पुन्हा एका नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.

Bastar चित्रपटाचा पहिला लूक समोर

ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी ही माहिती दिली. त्यांनी ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar: The Naxal Story) या चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूकमध्ये अदा शर्मा अतिशय आक्रमक रूपात दिसत आहे. तिच्या हातात बंदूक आहे आणि ती लष्करी गणवेशात एका गटासह पुढे जाताना दिसत आहे.

त्यामुळे ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar: The Naxal Story) हा चित्रपटात नक्षलवाद्यांसंबंधित कथेवर असल्याचे म्हटले जात आहे. तरण आदर्श यांनी पोस्ट करत म्हटले की, “केरळ स्टोरीच्या यशानंतर चित्रपटाच्या निर्मात्यांनी अदा शर्मासोबत आणखी एक चित्रपट करण्याची घोषणा केली आहे. ‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. याची निर्मिती विपुल अमृतलाल सिंग करणार असून सुदीप्तो सेन दिग्दर्शित करणार आहेत.”, असे कॅप्शन तरण आदर्श यांनी दिले आहे.

‘या’ तारखेला रिलीज होणार चित्रपट

‘बस्तर: द नक्सल स्टोरी’ (Bastar) हा चित्रपट 15 मार्च 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अदा शर्माचा यातील लुक चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. त्यामुळे चाहते अजूनच उत्सुक आहेत. त्यात चित्रपटाची रिलीज डेटही समोर आली आहे. त्यामुळे चित्रपटाबद्दल सर्वांनाच उत्कंठा आहे.

चित्रपटाबद्दल बोलताना निर्माते अमृतलाल शाह (Amritlal Shah) यांनी म्हटले की, “बस्तर: द नक्सल स्टोरी हा चित्रपट एक कडू सत्य समोर आणणार आहे. याची कथा समोर आणणे आमच्या साठी सन्मानाची गोष्ट आहे. हा चित्रपट नक्कीच सर्वांना भावेल.”, अशी अपेक्षाही अमृतलाल यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे सध्या चित्रपटाचीच चर्चा होत आहे.

News Title- Bastar The Naxal Story film first look release

महत्वाच्या बातम्या- 

Amitabh Bachchan यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर!

IT Recruitment 2024 l कित्येक तरुणांचं स्वप्न होणार साकार! आयकर विभागाअंतर्गत नोकर भरती सुरु; आजच अर्ज करा

Weather Update | थंडी वाढणार, हवामान विभागाचा महत्त्वाचा इशारा

PM Ujjwala Yojana Online Apply 2024 l घरबसल्या मोफत गॅस सिलिंडरचा लाभ घेण्यासाठी अशाप्रकारे करा अर्ज

Woman Mental Health Tips l महिलांनी आताच व्हा सावध, ही लक्षणं असतील तर तुमची मानसिक स्थिती नाही बरोबर!

Join WhatsApp Group

Join Now